मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
स्मार्टफोन ही सध्या काळाची गरज बनली आहे. पण लहान मुलांसाठी स्मार्टफोन अतिवापर धोकादायक ठरू शकतो.
यामुळेच पालक अनेकदा त्यांच्या मुलांना स्मार्टफोनपासून दूर राहण्याचा सल्ला देताना दिसतात. मात्र मध्यप्रदेशाच्या बालाघाट येथे आपल्या मुलाला हे सांगणे एका आईच्या जीवावर बेतले आहे.
मध्यप्रदेशमध्ये मोबाईल वापरण्यावरून मुलाने स्वत:च्या आई-वडीलांवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात मुलाच्या आईचा मृत्यू झाला असून सध्या त्याचा वडीलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना ५ मार्च रोजी घडली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार सत्यम नावाच्या मुलाला त्याच्या वडिलांनी मोबाइल फोन पाहणे थांबवण्यास सांगितल्याचा राग आला. त्याने लोखंडी रॉड घेतला आणि वडिलांच्या डोक्यात वार केला.
यादरम्यान मुलाची आई वाद थांबवण्यासाठी मध्ये आल्यानंतर त्याने तिच्यावरही वार केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
मुलानेच पोलिसांना फोन करून या घटनेबद्दल माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मुलाच्या वडिलांची प्रकृतीदेखील नाजूक असल्याचे सांगितले जात आहे.
त्यांना महाराष्ट्रातील गोंदिया येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शेजाऱ्यांनी सांगितले की सत्यम कोणाशीही बोलत नसे. तो नीटच्या कोचिंगसाठी कोटाला गेला होता पण चार महिन्यांत परतला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज