mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आमदार साहेब! आमच्या भागात पाणी आणा.. तुमचा फोटो देव्हाऱ्यात लावतील; आ.समाधान आवताडे यांना शेतकऱ्यांची आर्त विनवणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 9, 2024
in मंगळवेढा, राजकारण
मोठी बातमी! नगरोत्थान अभियान योजना जिल्हास्तर अंतर्गत २ कोटी ५५ लाख निधी मंजूर; आमदार समाधान आवताडे यांची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स। 

आमदार साहेब… आमच्या भागात एकदा पाणी आणा शेतकरी तुमचा फोटो देव्हाऱ्यात लावेल अशी आर्त विनवणी नंदेश्वर येथील नागरिकांनी आ.समाधान आवताडे यांच्याकडे केली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाचा केंद्रबिंदू असलेल्या नंदेश्वर गावात आ.समाधान आवताडे यांनी नागरिकांशी संवाद साधला यावेळी नागरिकांनी दुष्काळी भागात पाणी आणण्यासंदर्भात विनवणी केली.

यावर आ.अवताडे यांनी मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी बांधणी आणण्याची मंगळवेढा उपसा सिंचन योजना पूर्णत्वास येण्यासाठी आमचे अगदी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आणि यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अनुकूल आहेत. त्यामुळे दुष्काळी भागातील जनतेने थोडा धीर धरावा आपली योजना अगदी दृष्टीक्षेपात आहे असे उत्तर दिले.

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील 24 गावांनी नुकताच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा व 24 गावे कर्नाटकला जोडण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बहिष्कारच्या निर्णयामुळे आ.आवताडे यांच्या या दुष्काळी भागातील केंद्रबिंदू असलेल्या नंदेश्वर गावाला दिलेल्या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान दुष्काळी भागातील गत आठवडाभरात ज्या ज्या कुटुंबातील व्यक्ति मृत पावल्या आहेत. त्या कुटुंबांना सांत्वन भेटी देण्यासाठी आ.आवताडे हे या भागात आले होते. नंदेश्वर गावातीलही गरंडे कुटुंबाला त्यांनी यावेळी सांत्वनपर भेट दिली.

आ‌.आवताडे हे नंदेश्वर गावात येणार आहेत याची माहिती लागल्यानंतर नंदेश्वर गावातील सर्व नेतेमंडळी आणि नागरिक बाळकृष्ण महाराजांच्या जुन्या मंदिरासमोर मोठ्या संख्येने एकत्रित आले होते. त्यावेळी आ.आवताडे हे तिथे आले आणि चर्चा चालू झाली. चर्चेदरम्यान नागरिकांनी पाणी आणण्यासंदर्भात मागणी केली.

वर्षानुवर्षे मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न प्रलंबित राहिला आहे. वेळोवेळीच्या लोकप्रतिनिधींनी पाणी आणण्याचे केवळ गाजर दाखवून या पाणी प्रश्नाचे राजकारण केले आहे. त्यामुळे पाणी येईल हा विश्वास या भागातील जनतेला राहिला नाही.

या सर्व कारणांमुळे आ. आवताडे यांचे सोबत चर्चा करताना नंदेश्वर येथील नागरिक अगदी नैराश्य भावनेने बोलत असल्याचे यावेळी दिसले. पण आ.समाधान आवताडे हे मंगळवेढा तालुक्याचे भूमिपुत्र असल्यामुळे या प्रश्नाला न्याय देतील असेही काही जणांच्या बोलण्यातून दिसले.

पाणी येणारच…

आजपर्यंत मंगळवेढा तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी कोणत्या प्रतिनिधींनी कसे, कोणाला, किती वेळा फसवले यावर मला कसलेही भाष्य करायचे नाही. तुमची आजपर्यंत वारंवार फसवणूक झाली आहे. त्यामुळे तुमची भावना माझ्या लक्षात येतेय.

पण मी फसवणारा माणूस नाही तुम्ही विश्वास ठेवा अगर न ठेवा पण दिलेला शब्द मी पाळणार आहे आणि या भागात पाणी आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांचे आणि माझे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हेही अनुकूल आहेत त्यामुळे दुष्काळी भागातील जनतेने निश्चिंत राहावे आपल्या भागात पाणी येणारच आहे.- आ. समाधान आवताडे

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
Next Post
मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता 'या' वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

ताज्या बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..