टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याचे आमदार संजय शिंदे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून, सध्या पुणे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माझी तब्येत उत्तम असून नागरिकांनी काळजी करू नये, असे आवाहन स्वत: आमदार संजय शिंदे यांनी केले आहे .
मंगळवारी आमदार शिंदे व त्यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण शिंदे यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या दरम्यानच्या काळात त्यांच्या संपर्कात जे-जे आलेले आहेत त्यांनी स्वतःहून क्वारंटाईन व्हावे आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार संजय शिंदे यांनी केले आहे.
तालुक्यातील नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर पाळावे, अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही आमदार संजय शिंदे यांनी केले आहे.
पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यासाठी आमदार संजय शिंदे हे सहभागी झाले होते.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांपूर्वी आमदार शिंदे यांनी जेऊर (ता. करमाळा) येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली होती. तेथे प्रशासकीय व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी कोव्हिड केअर सेंटर उभारण्याबाबत चर्चाही केली होती.(स्रोत : सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज