टीम मंगळवेढा टाईम्स ।
उजनी लाभक्षेत्राच्या मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकासाठी वापरलेल्या पाण्याची पाणीपट्टीची आकारणी वापरानुसार करावी अशी मागणी आ.समाधान आवताडे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली.
जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे लाभक्षेत्र विकास जलसंपदा प्रकल्पाबाबत आढावा बैठकीत ही मागणी करण्यात आली.
यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह दीपक साळुंखे माजी सभापती प्रदीप खांडेकर, सुभाष ढेकळे पाटील आदी उपस्थित होते.
दुष्काळी मंगळवेढा तालुक्यामध्ये उजनी कालव्याद्वारे अलीकडच्या काळात सिंचन क्षेत्रात वाढ झाली असली तरी या सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी एकदा जरी वापरले तरी पूर्ण हंगामाची पाणीपट्टी भरण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे. तो शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीचा ठरत आहे.
त्यामुळे तशा पद्धतीने आकारणी न करता जेवढे पाणी वापरले तेवढेच आकारणी करावी अशी मागणी यावेळी केली.
याशिवाय 35 गावासाठी असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेबाबत प्रस्ताव शासनाकडे दाखल असून यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करावी व पौट येथील साठवण तलावास महामंडळाने प्रशासकीय मान्यता दिली.
परंतु स्थानिक शेतकऱ्यांच्या भूसंपादन विरोधामुळे काम होऊ शकले नाही. व महामंडळाने दि.16 मार्च 2020 रोजी प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता रद्द केली.
पावसाचे व म्हैसाळ योजनेतून शिरनांदगी तलावात सोडण्यात येणाऱ्या पाण्याने तलाव भरल्यानंतर ते पाणी चिक्कलगीतून पुढे बावची पासून पुढे वाया जात आहे.
या ठिकाणी तलाव झाल्यास आणखीन सिंचन क्षेत्रांमध्ये मोठ्या वाढ होणार आहे या भागातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन 17 गावच्या ग्रामपंचायतीनी ठरावाद्वारे केली.
तलावाच्या कामास सुधारित दराप्रमाणे अंदाजपत्रक करून त्यात प्रशासकीय मंजुरी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध निधी करणेसाठी व पौट येथील साठवण तलाव पुनर्जीवित करणे या दोन्ही योजनांची वस्तुस्थिती सांगितली असता त्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत योग्य कार्यवाही करण्याचा शब्द दिला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज