टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर लोकसभेच्या जागेवरून आमदार प्रणिती शिदे आणि आमदार रोहित पवार यांच्या दावे- प्रतिदाव्यावरून केलेले वक्तव्य दोन दिवसांपासून सोलापुरात गाजत आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या या वादात आता तिसऱ्या व्यक्तीने उडी घेतली आहे. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची कन्या अॅड. कोमल साळुंखे यांनी दोन्ही आमदारांवर निशाणा साधला आहे.
‘महाराष्ट्रातील मूलभूत प्रश्न जसेच्या तसे असताना या आमदारांचा मतदारसंघ शाबूत ठेवण्याचा अट्टाहास म्हणजे दुर्देवी प्रकार असल्याचे कोमल साळुंखे यांनी म्हटले आहे.
शिदे-पवार यांच्या राजकीय वादावर त्यांनी केलेली टीका राज्य आणि सोलापूर जिल्ह्याविषयी असलेल्या तळमळीतून केली आहे की, हा केवळ पब्लिसिटी स्टंट आहे, अशी चर्चा सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील राजकीय गोटात होत आहे.(स्रोत:लोकमत)
तिकडे साखर भरवली अन्….
माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा इंदापूर विरोधक तालुक्यामध्ये एकाच पक्षातील परंतु कट्टर असलेल्या कार्यकर्त्याचे मनोमिलन करत असल्याचा व्हिडीओ फिरत आहे.
या व्हिडीओमध्ये दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना साखर भरवून वाद संपवल्याचे दिसत आहे. या व्हिडीओची सोलापुरात मात्र राष्ट्रवादीमध्ये पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.
सत्तेमध्ये असताना भरणे यांच्याकडे सोलापूरकच्या पालकमंत्री पदाचा जबाबदारी होती. यावेळी पक्षामध्ये अंतर्गत गटबाजी वाढली होती.
अनेकांनी याबाबत थेट पक्षनेतृत्वाकडे तक्रारदेखील केली होती. यानंतर हा विषय आणखीन वाढतच गेला. स्थानिक कार्यकर्त्यांमधील दरी वाढली गेली;
पण सोलापूरचे पालकमंत्री असताना भरणे यांनी हाच प्रयोग सोलापुरात केला असता तर येथे पक्षवाढीस आणखीन फायदा झाला असता अशी चर्चा ही केवळ राष्ट्रवादीतच नाही तर इतर पक्षात देखील होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज