टीम मंगळवेढा टाईम्स।
नवे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ आता सुरू होत असून राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख , जैन , पारशी व ज्यू या अल्पसंख्याक समाजातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्जाची योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेच्या लाभासाठी इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत , असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.लालमिया शेख यांनी केले आहे.
अल्पसंख्याक समाजातील दहावी आणि बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.
आयटीआय , पॉलिटेक्निक , इंजिनिअरींग , मेडिकल , नर्सिंग , फॅशन डिझायनिंग , टुरिझम , पत्रकारिता , मास मीडिया , चित्रपट निर्मितीशी संबंधित विविध व्यावसायिक अभ्यासक्रम , अॅनिमेशन , हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहेत , असे डॉ . शेख यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या डॉ . ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेतून ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळू शकते. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याचे वय १६ ते ३२ वर्ष असावे,
तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरी भागासाठी १ लाख २० हजार रुपयांपेक्षा कमी , तर ग्रामीण भागासाठी ९ ८ हजार रुपयांपेक्षा कमी असावी.
राज्य शासनामार्फत मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत असून यामधून ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते.
या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याचे वय १८ ते ३२ वर्ष असावे , तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत असावी , अशा अटी आहेत . दोन्ही शैक्षणिक कर्ज योजनांसाठी व्याजदर फक्त ३ टक्के आहे.
विद्यार्थ्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पुढील ५ वर्षात कर्जाची परतफेड करायची आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज