टीम मंगळवेढा टाईम्स ।
मागील वर्षी आषाढी यात्रेदरम्यान घेतलेल्या आरोग्य शिबिरात ११ लाखांच्या आसपास भाविकांना उपचार देण्यात आले होते.
यंदाही पंढरपूर तालुक्यातील पालखी तळ (वाखरी), विष्णुपद मंदिराजवळ (गोपाळपूर) व तीन रस्ता व ६५ एकर (शेगाव दुमाला) या चार ठिकाणी महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे.
१५ ते १८ जुलै या चार दिवसांच्या कालावधीत १५ लाखांच्या आसपास भाविकांना २४ तास मोफत आरोग्य सेवा देणार असल्याचे भैरवनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा.शिवाजी सावंत यांनी सांगितले.
आरोग्य शिबिर होणाऱ्या सर्व ठिकाणांची पाहणी प्रा. शिवाजी सावंत यांनी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, डॉ. दीपक धोत्रे, नोडल अधिकारी स्नेहा गणगे, श्याम गोगाव आदीजन उपस्थित होते.
पुढे सावंत म्हणाले, पंढरपुरात विविध जिल्ह्यांतून तसेच परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक येतात. यात्रेदरम्यान भाविकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. भाविकांना आरोग्याच्या समस्या होतात. त्या वारकरी भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात येत आहे.
आरोग्य तपासणी, डोळ्यांची, हृदय, रक्तक्षय, कान नाक घसा, हाडांची, दंत, रक्तगट, इसीजी व सिकलसेल तपासणी होणार आहे.
या दिवशी आरोग्य शिबिर..
आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान १५, १६, १७ व १८ जुलै २०२४ या कालावधीत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रा. सावंत यांनी दिली.
मोफत शस्त्रक्रिया…
तपासणीदरम्यान वारकऱ्यांना रोग आढळून आल्यास त्वरित उपचार, विनामूल्य औषधे, गरज असल्यास मोफत संदर्भसेवा, महात्मा फुले, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमार्फत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. सावंत यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज