टीम मंगळवेढा टाईम्स।
एका बाजूला शेतकऱ्यांना पावसाअभावी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना दुग्ध व्यवसाय हाच आज मोठा आधार ठरत आहे. दरम्यान, गेल्या तीन महिन्यात दुधाच्या खरेदी दारामध्ये
विविध कारणांनी कपात सुरू असून ३९ रुपये मिळणारा दर आज ३२ ते ३३ रुपयांवर आला आहे. यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. दोन दिवसापूर्वी गायी दूध खरेदी दरात १ रुपया २० पैसे इतकी कपात करण्यात आली आहे.
गेल्या वर्षेभरात दुधाच्या दरामध्ये स्थिरता राहिल्याने अनेक जण दुग्ध व्यवसायाकडे वळाले. यामध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक शेतकऱ्यांच्या मुलांनी केलेली आहे.
आज चारा व पाण्याची टंचाईचे संकट असतानाही दुग्ध व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. हे होत असताना दुधाच्या दरात मात्र सातत्याने कपात होत आहे.
दोन दिवसापूर्वी गायीच्या दुधामध्ये एक रुपया २० पैसे कपात करण्यात आली. यामुळे सध्या ३.५-८.५ गायीच्या दूधाला ३३ रुपये दर मिळत आहे.
एका बाजूला पशुखाद्य चाऱ्याच्या किमती भरमसाठ वाढत असताना दुसऱ्या बाजूला दूध दरात होणारी कपात दूध उत्पादक शेतकऱ्याला परवडणारी नाही.
गोळी पेंडीचे ५० किलोचे पोते आज १८०० रूपयाला मिळत आहे. गत पंधरा दिवसात यामध्ये १३० रूपयांनी वाढ झाली आहे. यामुळे दूग्ध उत्पादकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
दुग्ध उत्पादकांचे आर्थिक नियोजन कोलमडले
शेतकरी संघटनांनी खाजगी व सहकारी दूध संस्थांनी केलेल्या दूध दर कपातीच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने केली. त्यानंतर शासनाने दुधाची खरेदी किंमत प्रतिलिटर ३४ रूपये इतकी निश्चित केली.
मात्र त्यानंतरही दूध दरातील कपात सुरूच आहे. पशुखाद्य चाऱ्याच्या किमती वाढत असताना दूध दर कपात कशासाठी? दूध उत्पादकाचे यामुळे आर्थिक नियोजन बिघडले आहे. दूध दरातील कपात रद्द करावी अशी मागणी गादेगाव येथील दूग्ध उत्पादक तुकाराम बागल यांनी केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज