mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दमदार योद्धा! अध्यादेश आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही, आजपासून ‘हे’ सुटलं म्हणून समजा; मनोज जरांगे यांचा सरकारला थेट इशारा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 5, 2023
in राज्य
दमदार योद्धा! अध्यादेश आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही, आजपासून ‘हे’ सुटलं म्हणून समजा; मनोज जरांगे यांचा सरकारला थेट इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांडे यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे.

मराठा आरक्षणाचा जीआर घेऊन केव्हा येतात, याची वाट पाहतो. पण, जीआर आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही. आजपासून पाणी सुटलं म्हणून समजा, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.

मनोज जरांगे-पाटील म्हणाले, राज्य सरकारचे प्रतिनिधी येऊन निर्णय देऊ असं सांगण्यात आलं. राज्य सरकारच्या प्रतिनिधींना येताना मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन यावा. बैठका आणि चर्चेचे गुऱ्हाळ हे अपेक्षित नाही.

आतापर्यंत खूप चर्चा झाली. तुम्ही पहिले पाढे पुन्हा पुन्हा सांगू नका. सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असेल, अशी अपेक्षा आहे. मराठा आरक्षणाचा जीआर घेऊन केव्हा येतात, याची वाट पाहतो. पण, जीआर आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही. उद्यापासून पाणी सुटलं म्हणून समजा.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मराठा आंदोलकांवर 307 सारखे गुन्हे दाखल केले. ते मागे घेण्यात यावे. सरकारच्या प्रतिनिधींना दोन दिवसांचा वेळ दिला होता. आता एक दिवस शिल्लक आहे. मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार तेव्हाचं थांबणार, असं मनोज जरांगे-पाटील म्हणाले.

१०० टक्के राज्य सरकारने चांगला निर्णय घेतला असेल. मराठा आरक्षणाचे पत्र राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी यावं. जीआर जर आलं नाही. तर आंदोलन थांबणार नाही. उलट उद्यापासून पाणी सुटलं म्हणून समजा. तुमच्या आईला मारलं. त्यांना कायमचे बडतर्फ करा. आम्ही काही मर्डर करण्याची जमात नाही. दहशतवाद्यांचा कॅम्प नाही. हत्यार हाती घेत नाही. खून करण्याच्या उद्देशाने आम्ही काही बाहेर पडत नाही, असं मनोज जरांगे-पाटील म्हणाले.

मराठा घाबरला नाही. खचला नाही. मनानं मजबूत लोकं आहेत. पोरांमध्ये ऊर्जा आहे. मी मराठा आरक्षण मिळवून देणार तेव्हाचं थांबणार. अधिकृत शिष्टमंडळ येईल, असं ऐकलं. शिष्टमंडळ आल्यानंतर उद्या आम्ही सर्व जण बसून पुढचा निर्णय घेऊ. परवा आम्ही आंदोलनाचा दिशा ठरवणार. त्यासाठी मोठी प्रेस घेऊ, असंही मनोज जरांगे-पाटील म्हणाले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मनोज जरांगे

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
Next Post
विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव मंगळवेढ्यातील कदम गुरुजी महाविद्यालयात होणार; वयोमर्यादाही बदलली

तरुणाईचं जान! सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा 19 वा युवा महोत्सव 'या' तारखे दरम्यान स्वेरी कॉलेजमध्ये रंगणार

ताज्या बातम्या

नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा