मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्किंग।
हवामान खात्याने जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना अडचण उद्भवल्यास तात्काळ संपर्क साधण्याच्या दृष्टीने तहसीलदार मदन जाधव यांनी तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करून २४ तास कर्मचारी तैनात केले.
ऑगस्ट महिन्यात नदीला आलेल्या पुराने नदीकाठच्या शेतकऱ्यांना फटका बसला असतानाच १० सप्टेंबरपासून तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसाने तालुक्यातील खरीप पिकाचे व फुल गळतीमुळे डाळिंब उत्पादकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
महसूल प्रशासनाच्या वतीने बाधित शेतकऱ्याच्या पिकाचे पंचनाम्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सततच्या पावसामुळे ढवळस येथे भिंत कोसळून ११ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने
तहसीलदार मदन जाधव यांनी तलाठ्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पडीक घराची माहिती घेऊन संबंधित घराच्या आसपास वापरू नये पावसाच्या पाण्यामुळे जुन्या पडक्या घरात वास्तव्य देखील करू नये असा सूचना दिल्या.
डोणज, नंदुर या भागात काही घरांची पडझड देखील झाली. सध्या झालेल्या पावसामुळे शिरनांदगी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे त्यामुळे शिरनांदगी-जाडर बबलाद हा मार्ग बंद आहे.
चिक्कदगी गावाजवळील ओढा भरून वाहत आहे. तालुक्यातील बहुतांश मध्यम प्रकल्प देखील भरले. यापूर्वी २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान तालुक्याच्या दक्षिण भागातील बहुतांश गावाशी संपर्क तुटला.
यंदा २७ ते ३० सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे सध्या प्रशासन अलर्ट असून दवंडी, सोशल मीडिया माध्यमातून जनतेला सतर्कची सूचना दिली होती.
हेल्पलाईन नंबर
तहसील कार्यालय मंगळवेढा आपत्ती व्यवस्थापन कक्ष हेल्पलाईन नंबर ०२१८८-२२०२४१ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज