टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमधील जवळपास ११ सदस्य अपात्र केल्याची धाडसी कारवाई सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली आहे.
यामध्ये काही ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक खर्च विहित नमुना सादर केला नाही, तर काही सदस्यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या;
त्याची सुनावणी घेऊन मंगळवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बारा सदस्यांना अपात्र करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ सुरू झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील भोसे ग्रामपंचायत सदस्य सखुबाई बाजीराव नागणे यांनी निवडणूक खर्च वेळेत सादर न केल्याची तक्रार महादेव गायकवाड यांनी दाखल केली होती.
तर वरकुटे (ता. करमाळा) येथील ग्रामपंचायतच्या सात सदस्यांनी यामध्ये दादासाहेब भांडवलकर, नीलकंठ पवार, शालन शिंदे, अशोक बेडकुते, ज्योती भंडारे, शोभा तिरंगे, गंगुबाई मस्के यांनी निवडणूक खर्च विहित नमुन्यात सादर न केल्याची तक्रार वरकुटे येथील सुभाष काशीनाथ बेडकुते व इतर तीन जणांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे केली होती.
याची शहानिशा करून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी मंगळवारी या सदस्यांचे सदस्यत्व अपात्र करण्यात आल्याची कारवाई केली आहे. तर बार्शी तालुक्यातील कळमवाडी येथील मंगल महादेव मुंडे यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार विकास मुंडे यांनी केली होती.
तर स्मिता शिंदे, मिटू एडके, प्रभावती मुंडे यांनीही गावातील शासकीय जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार विकास मुंडे यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे केली होती. याची शहानिशा करून मंगळवारी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी जवळपास ११ सदस्य अपात्र केल्याचे आदेश जारी केले आहेत.
यामध्ये बार्शी तालुक्यातील कळमवाडीचे चार तर करमाळा तालुक्यातील वरकुटे गावातील एकूण सात सदस्यांचे सदस्यत्व अपात्र करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतीची सत्ता संपुष्टात आली आहे. वरकुटे येथील एकाच ग्रामपंचायतीचे सात सदस्य एकाच वेळी अपात्र झाल्याने जिल्ह्यात खळबळ सुरू झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज