टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातुन अवजड होत असल्याने अपघाताची शक्यता गृहित धरून अवजड वाहनाला अटकाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक कमान बसविणे या विषयावर चर्चा करण्यासाठी
आज गुरूवार दि.२१ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वा. मंगळवेढा नगरपरिषद सभागृहामध्ये बैठक आयोजित केली असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मंगळवेढा शहरामधुन कर्नाटक राज्यात जाण्यासाठी पंढरपुर – मंगळवेढा – विजापुर राष्ट्रीय शहरातून महामार्ग एन एच ५६१ हा जात असुन या राष्ट्रीय महामार्गामधुन शहरात जड वाहतुक सुरु आहे.
या महामार्गालगत इंग्लीश स्कुल प्रशाला, बसस्थानक, शाळा, कॉलेज सुटल्यानंतर विदयार्थ्यांची शहरात होणारी गर्दी, दामाजी पंताच्या दर्शनासाठी येणारे भाविक, दुकानांची व हॉटेलची संख्या मोठी असल्याने या अवजड वाहनामुळे विदयार्थ्यांच्या जीवीताला धोका होण्याची शक्यता नाकारता येत अवजड जाण्यास
वाहनाला अटकाव होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार नगरपरिषद प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी बी.आर. माळी यांनी प्रतिबंधात्मक बसवणेकामी तसेच अवजड प्रवेशबंदी हा फलक लावणेबाबत आदी विषयावर चर्चा करणेकामी नागरिक व विविध शासकिय अधिकारी यांची बैठक बोलावली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज