टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात व तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मान्सूनपूर्व पावसाने तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.आदीच आर्थिक अडचणीत शेतकऱ्यांना दुष्काळात धोंडा महिना सोसावा लागला.
वादळी वाऱ्याचा फटका दामाजी कारखान्याच्या कामगार वसाहतीला देखील बसला आहे पत्रे उडाल्याने मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.
सायंकाळी ६.३० वाजणेचे सुमारास झालेल्या वादळामुळे श्री.संत दामाजी सह.साखर कारखान्याच्या कामगार वसाहतीवरील पत्रे अँगलसह उडाल्यामुळे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मागील दोन ते चार दिवसापासून कारखाना परिसरात चक्रीवादळाचा परीणाम जाणवल्याने जोराचा वारा सुटल्याने व पावसाचे वातावरण तयार झाले होते.
त्यामुळे सायंकाळी ६.३० वाजणेचे सुमरास ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाटासह जोरदार वारे सुटले होते.
या वाऱ्यामुळे कारखान्याच्या वसाहती मधील पत्रे अँगलसह उचकटून उडून इतरत्र पडल्याने कारखान्याचे कामगार वसाहतीमधील अंदाजे १० लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे.
परंतु या वादळामुळे कोणतीही जिवीत हानी झालेली नसल्याचे माहिती कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक श्री.रमेश गणेशकर यांनी दिली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने घेतला हिरावून
वातावरणातील बदलानूसार घ्यावी लागणारी फवारणी, मजूर टंचाई, महागडी औषधे, या फळबाग उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला.
शेतात पुरेसे पाणी आहे आणि उत्पन्न हाती लागेल या आशेपोटी ज्वारीच्या व ऊसाच्या शिवारात ज्वारीचे कमी उत्पन्न व ऊसाचे बिले वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून डाळीब व द्राक्ष उत्पादनाचे कल वाढला.
मंगळवेढा, सिध्दापूर, अरळी, ब्रम्हपुरी, नंदूर, मरवडे, सलगर बुभोसे, रड्डे, भाळवणी, तळसंगी, डोणी या ठिकाणी द्राक्ष क्षेत्रात वाढ झाली.पिन बोरर,होल बोरर मुळे डाळीब उत्पादक शेतकरी उध्वस्त झाला असताना शासनाने कोणत्याही मदत व केंद्र सरकारचे पॅकेज मिळाले नाही.
यंदा द्राक्ष उत्पादकाला काही तरी हाती लागेल अशी आशा होती.त्यासाठी महागड्या दराची औषधे,मजूर टंचाईने मागणीप्रमाणे मजूरी देऊन मजूर उपलब्ध करून बागेची जोपासना केली.
त्यात महावितरण सरसकट केलेला खंडीत वीज पुरवठा अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी झाडावर असलेली द्राक्षे मिळेल त्या किमतीला विकली मात्र वातावरणात बदलामुळे द्राक्षे विक्रीस येण्यास विलंब लागला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज