टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे भाजप आमदार राम सातपुते यांच्या गाडीला अपघात झाला आहे.
राम सातपुते यांनीच फेसबुकवर व्हिडिओ शेअर करुन गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती दिली आहे.
“मी सुखरूप आहे, मला कसल्याही प्रकारची इजा झालेली नाही. आतापर्यंत केलेलं काम आणि लोकांच्या आशीर्वादामुळे मी थोडक्यात बचावलो”, अशी प्रतिक्रिया अपघातानंतर त्यांनी दिली आहे.
आपल्या पक्षाची रोखठोक आणि आक्रमक पद्धतीने बाजू मांडण्यासाठी राम सातपुते यांची राज्यभरात ओळख आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांना ओळखलं जातं.
आज विविध कामांसाठी मतदारसंघात ते गाडीने प्रवास करत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने कोणालाही इजा झालेली नाही.
अपघातानंतर राम सातपुते यांनी व्हिडिओ जारी करत म्हटलं आहे, “मतदारसंघातील प्रवासादरम्यान माझा अपघात झाला.
यामध्ये गाडीचे तीन टायर फुटले. परंतु जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने, आजपर्यंत माझ्या हातून जे काही पुण्य घडलं तसेच पांडुरंगाच्या कृपेने मी या अपघातातून सुखरूप बचावलो.
तालुक्यातील जनतेच्या आशिर्वादाने माझ्या केसालाही धक्का लागला नाही. मला आणि माझ्या सोबत असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची इजा अथवा काहीही दुर्घटना घडलेली नाही.
कुणीही काळजी करु नये, असं आवाहन राम सातपुते यांनी केलं आहे.(स्रोत:थोडक्यात घडामोडी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज