टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील भक्ती व नम्रता चव्हाण या दोन मुलींच्या विषबाधा मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल असलेले आरोपी संतोष लहू कोंडुभैरी व आकाश धोंडीबा फुगारे या दोघांना पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या पथकाने नाशिक जिल्हयातून त्या दोघांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली.
दरम्यान या दोघांना मंगळवेढा न्यायालयात उभे केले असता पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
या घटनेची हकिकत अशी, मरवडे येथील भक्ती व नम्रता चव्हाण हिच्या वडीलांनी मंगळवेढयातील समर्थ दुध डेअरीमधून दि. 22 डिसेंबर रोजी बासुंदी, श्रीखंड, रबडी, पनीर घरी नेले होते.
ते खाल्ल्यानंतर त्यांना त्रास होवू लागल्याने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले मात्र उपचार सुरु असताना त्या दोघींचा मृत्यू झाला तर आई वडील उपचारासाठी दाखल होते.
मृत्यूनंतर अन्न भेसळचे अधिकार्यांनी वरील दोघा आरोपीविरूध्द दि.24 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता.
डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील,पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार सत्यजीत आवटे, पोलिस नाईक दयानंद हेंबाडे, शिवाजी पांढरे, सुनिल मोरे व सायबरचे अन्वर आतार यांच्या पथकाने नाशिक जिल्हयातील सिन्नर या ठिकाणी दि.6 रोजी पहाटे छापा टाकून आरोपींना पकडले.
त्या दोघांना गुरुवारी मंगळवेढा न्यायालयात उभे करण्यात आले. यावेळी आरोपीच्यावतीने अॅड.धनंजय हजारे तर सरकार पक्षाच्यावतीने अॅड.धनंजय बनसोडे यांनी बाजू मांडली.यावेळी आरोपींना दि.10 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश केले.
प्रभाकर देशमुख यांचे आंदोलन सुरूच
जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यानी मरवडे येथे रास्ता रोको करून डी.वाय.एस.पी.कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करून आरोपीस अटक करण्याची मागणी केली होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज