टीम मंगळवेढा टाईम्स ।
मरवडे ग्रामपंचायत निवडणूकीत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या गाव विकास आघाडीने पवार गटाचा दारुण पराभव केला आहे.
यासाठी नामदेव गायकवाड सर,नामदेव घुले,राजेंद्र पोतदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे लतिफ तांबोळी,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दत्तात्रय गणपाटील,परिचारक गटाचे श्रीकांत गणपाटील,कालुंगे गटाचे संदीप सुर्यवंशी यांनी ही निवडणूक लढवून सत्ता प्रस्थापित केली आहे.
दत्तात्रय गणपाटील यांचे नेतृत्व फुलले
दत्तात्रय गणपाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.
त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत गाव विकास आघाडीमधून अनेक तरूण नेतृत्व पुढे आणले आहे.त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी करून दिले आहे.
या निवडणुकीत मरवडे गावात दत्तात्रय गणपाटील यांचे नेतृत्व सर्वसामान्य जनतेने मान्य केले असल्याचे दिसून आले.
मंगळवेढा तालुक्यातील 22 ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थेतील नेत्यांना आपल्या गावात वर्चस्व राखण्यात यश आले, तर दोन नेत्यांना सत्ता राखण्यात अपयश आले.
त्यामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, पंचायत समिती सभापती प्रेरणा मासाळ, सदस्य रमेश भांजे यांनी गावातील सत्ता ताब्यात ठेवण्यात यश आले.
जिल्हा परिषद सदस्य नितीन नकाते गटाला अपयश आले आहे. मंगळवेढा तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीच्या सुमारे 186 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणीत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या सलगर बुद्रूक व पंचायत समितीच्या सभापती प्रेरणा मासाळ यांच्या हुलजंती गावातील लढत लक्षवेधी बनले होती.
परंतु या दोन्ही नेत्यांनी आपले वर्चस्व गावात अबाधित राखले आहे. चव्हाण यांच्या गटाने ग्रामपंचायतीच्या सर्वच सर्व जागा जिंकल्या आहेत,
तर सभापती प्रेरणा मासाळ यांच्या हुलजंती गावात अकराच्या अकरा जागा जिंकून त्यांनीही आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. बालाजीनगर येथील दोन उमेदवारांना 159 अशी समसमान मते पडली होती. मात्र, चिठ्ठीत श्रीकांत चव्हाण हे विजयी झाले.
मरवडे येथे सत्ताधारी गटाला विरोध करत स्थापन करण्यात आलेल्या गाव विकास आघाडीने आठ जागेवर वर्चस्व मिळवित ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेतली आहे. लवंगी ग्रामपंचायतीवर भालके गटाचे वर्चस्व कायम राहिले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाले आहे. तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार हे डोणज ग्रामपंचायतीवर विजयी झालेले आहेत.
नंदेश्वर ग्रामपंचायतीवर माजी उपसभापती दादा गरंडे यांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे, तर ममदाबाद (शे.) येथे समविचारी तरुणांनी एकत्र येत स्थापन करण्यात आलेल्या गाव आघाडीने सत्ता मिळविली आहे.
सिद्धापूर येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बापूराव चौगुले यांनी अकरा पैकी सहा जागा घेत वर्चस्व कायम ठेवले आहे. लेंडवे चिंचाळे, तांडोर, अरळी येथील विजयी उमेदवारांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज