mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

प्रशांत परिचारक यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू; भूमिका अजून संदिग्ध; मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील सर्वच इच्छुक गॅसवर; तर शरद पवार गटाकडून उमेदवार निवडीत घोळ?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 24, 2024
in मंगळवेढा, राजकारण, राज्य, सोलापूर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची जागा शरद पवार यांच्याकडे असून त्यांनी या जागेसाठी भगीरथ भालके प्रशांत परिचारक आणि अनिल सावंत या तिघांच्या नावावर विचार सुरू ठेवला आहे.

मात्र, अजूनही निर्णय न झाल्याने अखेर आज भगीरथ भालके हे आपला उमेदवारी अर्ज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी दाखल केला आहे.

दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही पंढरपूर, मंगळवेढा या दोन्ही तालुक्यात कार्यकर्त्यांचा कानोसा घेण्यासाठी गेल्या चार दिवसापासून मॅरेथॉन बैठका सुरू केल्याने त्यांची ही भूमिका अजून संदिग्ध आहे.

काय सांगताय! साडी खरेदीवर चक्क सोन्याची नथ मोफत, 10 हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट; दीपावली निमित्ताने मंगळवेढ्यातील ‘शीतल कलेक्शन’ची फुल पैसा वसूल ऑफर

परिचारकांच्या निवडणूक लढण्याच्या भूमिकेमुळे भाजपने विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचीही उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र, परिचारक हे शरद पवार गट किंवा अपक्ष निवडणूक लढविण्याच्या मानसिकतेत असल्याने येत्या दोन दिवसात भाजप आमदार समाधान आवताडे यांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसला फार मोठी आघाडी मिळाल्याने आता मनोज जरांगे पाटील यांचाही उमेदवार पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात येऊ शकणार आहे. त्यामुळे आता येथील लढत बहुरंगी होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाची उमेदवारी अजूनही दोन दिवस लांबण्याची शक्यता असल्याने सर्वच इच्छुक गॅसवर आहेत.

तर मनसेचे दिलीप धोत्रे यांची उमेदवारी सुरुवातीला जाहीर झाल्यामुळे त्यांनी एक महिण्याआधीच प्रचाराला सुरुवात केली आहे ते ही दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यात सुरुवात होऊन दोन दिवस झाले तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये असणारा महाविकास आघाडीचा तिढा सुटायला तयार नसून हीच अवस्था महायुतीची देखील बनली आहे.

जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात त्रांगडे झाले असून सांगोला मतदार संघात ठाकरे गटाने आधी उमेदवारी जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडी तर बिघाडीच झाल्याचे समोर येत आहे.

पंढरपूर, माढा, मोहोळ आणि करमाळा या चार मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुती दोघांकडूनही उमेदवार देण्यास अजूनही दोन दिवस लागणार आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या उमेदवार देण्याच्या घोषणेमुळे जिल्ह्यात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता.

विधानसभेला माढ्यात काय होणार?

माढा विधानसभा मतदारसंघ हा सर्वात जास्त चर्चेत असला तरी शरद पवार गटाकडे उमेदवारांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. हीच पवारांची अडचण असून सध्या तरी माढ्यातून विद्यमान आमदार बबनदादा शिंदे, अभिजीत पाटील आणि संजय कोकाटे या तीन नावावर विचार सुरू आहे.

अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी महायुतीतून लढणार नसल्याचे जाहीर करीत शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितल्याने महायुतीकडे उमेदवारच शिल्लक नाही. अशा परिस्थितीत जागा वाटपात ही जागा शिंदे सेना घेऊन या मतदारसंघातून शिवाजीराव सावंत किंवा शिवाजीराव कांबळे यापैकी एकाला उमेदवारी देऊ शकतात.

माढा विधानसभा मतदारसंघातही मनोज जरांगे यांचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात असल्याने या जागेवर जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय धनंजय साखळकर हेही उतरण्याची तयारी करीत आहेत. सध्या तरी माढ्यात महायुतीला पुन्हा नव्याने उमेदवार शोधण्यापासून सुरुवात झाली आहे.

अशीच अवस्था सध्या करमाळा आणि मोहोळ या मतदारसंघात असून शरद पवार गटाकडे इच्छुकांची मांदियाळी दिसत आहे तर महायुतीला उमेदवार शोधावा लागत आहे.

करमाळा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटातर्फे माजी आमदार नारायण आबा पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना महायुतीच्या सोबत असणारे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांनी मात्र आपण याही वेळी अपक्ष निवडणूक लढविण्याचे घोषित केल्याने महायुतीला आमदार शिंदे यांना पाठिंबा दिल्याशिवाय सध्या तरी पर्याय नाही.

दुसऱ्या बाजूला करमाळ्यातील प्रबळ मानला जाणारा आणि सध्या भाजपसोबत असणारा बागल गटातून दिग्विजय बागल हे निवडणूक लढविण्याच्या तयारीत असून महायुतीतून ही जागा आपल्याला मिळावी असा बागल गटाचा प्रयत्न आहे. करमाळा मतदार संघात देखील मनोज जरांगे पाटील यांची मोठी ताकद असल्याने जरांगे या मतदारसंघात प्राध्यापक रामदास झोळ यांना उतरवण्याच्या तयारीत आहेत.

मोहोळ या राखीव मतदार संघात महाविकास आघाडी कडून विद्यमान आमदार यशवंत तात्या माने यांनाच पक्षाने उमेदवारी दिल्याने आता महाविकास आघाडीकडे संजय क्षीरसागर, राजू खरे, रमेश कदम आणि आता नुकताच प्रवेश केलेले भाजपचे लक्ष्मणराव ढोबळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

मोहोळ मध्ये माजी सनदी अधिकारी शैलेश कोथमीरे यांचेही नाव नव्याने चर्चेत आले असून नेमकी उमेदवारी कोणाला द्यायची हा पवार यांच्या पुढचा मोठा प्रश्न आहे. सध्या तरी मोहोळ मतदार संघातून संजय क्षीरसागर आणि राजू खरे या दोन नावावर गांभीर्याने विचार सुरू आहे.

शरद पवार गटाकडून उमेदवार निवडीत घोळ

एका बाजूला भाजप शिंदे सेना व उद्धव ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करीत आघाडी घेतली असताना शरद पवार गटाकडून मात्र अजूनही उमेदवार निवडीचा घोळ सुरूच आहे. आज जयंत पाटील हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुंबई बाहेर असणार आहेत,

तर सुप्रिया सुळे या हर्षवर्धन पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरायला गेल्या आहेत . शरद पवारही आज ठाणे येथे जाणार असल्याने आज संध्याकाळपर्यंत मुंबई शरद पवार गटात शांतताच असणार आहे.

मात्र उद्धव ठाकरे गटाने एकतर्फी उमेदवारांच्या घोषणा करून एबी फॉर्म वाटल्याने महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बिघाडी झाल्याचे चित्र दिसत आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ अजून पूर्णपणे संपलेला नसल्याने बिघाडी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांना काही जागांवरील उमेदवारांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की देखील येऊ शकणार आहे . असे न झाल्यास सोलापूर जिल्ह्यात सांगोला दक्षिण सोलापूर अशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती देखील दिसू शकणार आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: माजी आमदार प्रशांत परिचारक

संबंधित बातम्या

सौ.प्रीती तेजस सूर्यवंशी यांची प्रचारात आघाडी; प्रभाग क्र.5 मध्ये सूर्यवंशी यांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद

सौ.प्रीती तेजस सूर्यवंशी यांची प्रचारात आघाडी; प्रभाग क्र.5 मध्ये सूर्यवंशी यांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद

November 28, 2025
आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

November 28, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राज्यातील सर्व शाळा ‘या’ तारखेला बंद राहण्याची शक्यता; नेमकं कारण काय?

November 28, 2025
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

नागरिकांनो! मी आत एक आणि बाहेर एक भूमिका घेणारा माणूस नाही; आमदार समाधान आवताडेंनी स्पष्टच सांगितले…, चांगली माणसे निवडून द्या; अफवांवर विश्वास ठेवू नका

November 28, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत नगराध्यक्ष निवडणूक स्थगित राहण्याची दाट शक्यता; नगरसेवकपदांच्या निवडणुका मात्र पूर्ववत; आज चित्र स्पष्ट होणार

November 28, 2025
शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2025
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

November 28, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निकाल न्यायालयाने ठेवला कायम; नगराध्यक्षपदाची निवडणूक नियोजित वेळेत की पुढे ढकलणार? सस्पेन्स कायम

November 27, 2025
सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

November 27, 2025
Next Post
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मोठी बातमी! शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला संधी

ताज्या बातम्या

सौ.प्रीती तेजस सूर्यवंशी यांची प्रचारात आघाडी; प्रभाग क्र.5 मध्ये सूर्यवंशी यांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद

सौ.प्रीती तेजस सूर्यवंशी यांची प्रचारात आघाडी; प्रभाग क्र.5 मध्ये सूर्यवंशी यांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद

November 28, 2025
आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

November 28, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राज्यातील सर्व शाळा ‘या’ तारखेला बंद राहण्याची शक्यता; नेमकं कारण काय?

November 28, 2025
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

नागरिकांनो! मी आत एक आणि बाहेर एक भूमिका घेणारा माणूस नाही; आमदार समाधान आवताडेंनी स्पष्टच सांगितले…, चांगली माणसे निवडून द्या; अफवांवर विश्वास ठेवू नका

November 28, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत नगराध्यक्ष निवडणूक स्थगित राहण्याची दाट शक्यता; नगरसेवकपदांच्या निवडणुका मात्र पूर्ववत; आज चित्र स्पष्ट होणार

November 28, 2025
शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..