मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ४३ रेशन दुकाने नव्याने चालवायला देण्यासाठीचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे.
ही दुकाने प्राधान्याने महिला बचत गट, सामाजिक-सहकारी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना दिले जाणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील काही कारणास्तव रद्द झालेली रेशन दुकाने स्वतःहून सरेंडर केलेली दुकाने लोकसंख्या वाढल्याने नव्याने द्यावयाची रेशन दुकाने कोर्टाच्या आदेशाने
अथवा अनिमितपणामुळे पुरवठा विभागाने रद्द केलेले परवाने अशा जवळपास ४३ ठिकाणी नव्याने रेशन दुकाने देण्यासाठीचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे.
यामध्ये सर्वाधिक रेशन दुकाने मंगळवेढा तालुक्यात ९, बार्शी तालुक्यात ८ आहेत. अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ या तालुक्यात प्रत्येकी ५ रेशन दुकानांचा परवाना नव्याने देण्यात येणार असल्याचे या जाहीरनाम्यानमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
इच्छुकांनी विहित नमुन्यात, वेळेत अर्ज करावा
सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ४३ ठिकाणी नव्याने रेशन दुकानाचा परवाना देण्यासाठी जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला.
इच्छुकांनी विहित नमुन्यात, वेळेत म्हणजे ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत त्या-त्या तहसील कार्यालयांमध्ये अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज