टीम मंगळवेढा टाईम्स।
सांगोला येथील माणगंगा परिवार अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार व माणगंगा गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रम उद्या २६ जानेवारीला सायंकाळी चार वाजता एमबीएम मॉल, सांगोला येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे.
याप्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील, कुलपती डॉ. पी. डी. पाटील, आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
वैद्यकीय, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य, कला, कृषी, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांना माणगंगा परिवारातर्फे माणगंगा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व सांगोला तालुक्यातील पहिले एम. एस. सर्जन डॉ.अमर शेंडे यांना माणगंगा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले, मेडशिंगीच्या सचिवा सुवर्णा इंगवले, श्री श्री श्री रुद्रपशुपती कोळेकर महाराज, गुळमिरे उद्योग समूहाचे सोमनाथ गुळमिरे, आंतरराष्ट्रीय खेळाडू साक्षी सरगर,
सांगोला अर्बन को-ऑप. बँकेचे संस्थापक चेअरमन डॉ. प्रभाकर माळी, राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक विजेता नीरज महारनवर यांना माणगंगा गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन इंगोले यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज