मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी आलेल्या अहवालानुसार ४ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या १ हजार ४२३ झाली आहे.
मंगळवार दि ३ नोव्हेंबर रोजी २४१ रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.२४३ रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी २ जणाचे अहवाल पॉझिटिव्ह तर २३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सदरचे नागरिक चोखामेळा नगर-१,मारापूर-१ येथील आहेत.तसेच मंगळवारी नागरिकांचे स्वॅब करोना चाचणी साठी घेण्यात आलेले नाहीत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वॅब चे २ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.सदरचे नागरिक आंधळगाव १, बोराळे-१ येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकटतम संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत १ हजार ४२३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर १ हजार ३३० रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आता पर्यंत ५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे.
एखाद्या व्यक्तीस कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर त्यावर उपचार घेतल्यानंतर तो कोरोनामुक्त होतो. त्यानंतरही त्याने काळजी घेणे महत्त्वाचे आहे तसेच आरोग्यविषयक सर्व दक्षता घेणे गरजेचे आहे .
अन्यथा त्यास पुन्हा कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. कारण covid-19 व्हायरस हा चेंजेबल व्हायरस आहे.त्यामुळे भीती नको पण काळजी घ्या असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज