टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर शहरात रविवारी 210 जण कोरोना बाधित आढळले आहेत. त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 46 ते 79 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.
शहरातील रुग्णसंख्या आता 15 हजार 415 झाली असून त्यातील 710 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या 2 हजार 289 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
रविवारी शहरातील संशयितांच्या कोरोना टेस्टने 2 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एकूण 2 लाख 931 संशयितांची टेस्ट करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे होम क्वारंटाइनमध्ये 22 हजार 368 संशयित आहेत. दुसरीकडे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनवर भर देण्याचे जाहीर करूनही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये एकही संशयित नसल्याचे समोर आले आहे.
ग्रामीण भागातील 5 लाख 92 हजार 414 संशयितांची आतापर्यंत कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत 44 हजार 60 कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकूण रुग्णांपैकी एक हजार 222 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सध्या 2 हजार 631 रुग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
सोलापूर जिल्ह्यात दररोज साडेचार ते सव्वापाच हजार संशयितांची टेस्ट केली जात आहे. जिल्ह्यात विनामास्क तथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.
या पार्श्वभूमीवर बार्शी, माढा, माळशिरस, पंढरपूर या तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या वाढू लागली आहे.रविवारी मंगळवेढ्यात सात, अक्कलकोट तालुक्यात पाच, बार्शीत 128, करमाळ्यात 37, माढा 86, माळशिरस 53, उत्तर सोलापुरात चार, मोहोळ तालुक्यात 14, पंढरपूर तालुक्यात 49, सांगोला तालुक्यात पाच तर दक्षिण सोलापूर तालुक्यात तीन रुग्ण वाढले आहेत.
बार्शी, पंढरपूर या तालुक्यातील ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात रुग्ण वाढू लागले आहेत. कारवाया करूनही आणि निर्बंध घालूनही कोरोना कमी होत नसल्याने प्रशासन चिंतेत पडले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या हेतूने आगामी काळात प्रशासन ठोस निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
उपचार घेणारे तालुकानिहाय रुग्ण तालुका व ऍक्टिव्ह रुग्ण
मंगळवेढा : 76, अक्कलकोट : 79,बार्शी : 775,करमाळा : 443,माढा : 304,माळशिरस : 304,उत्तर सोलापूर : 116
मोहोळ : 47,पंढरपूर : 325,सांगोला : 100, दक्षिण सोलापूर : 62, एकूण : 2 हजार 631
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज