टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा तालुक्यात कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या शेतजमीन व प्लॉटिंगमध्ये पुनर्वसन एजटानी डमी स्वरूपात दाखले मिळवून प्रकल्पग्रस्त नसतानाही त्याची खरेदी विक्री केल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी अंतिम टप्प्यात आहे.
पहिल्या टप्प्यात २० गावातील ५७३ खातेदार यांच्या उताऱ्यावर अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या आदेशाने तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी कोयना खातेदारांचे संकलन होईपर्यंत शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर इतर हक्कात हस्तांतर बंदीचे शेरे मारण्याचे आदेश तलाठ्यांना दिले आहेत.
या आदेशामुळे जवळपास १ हजार ५४० एकर जमिनीच्या खरेदी विक्रीस ब्रेक लागणार आहे. कोयना प्रकल्पाला ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना मंगळवेढा तालुक्यात प्रकल्पग्रस्त म्हणून जमिनी व प्लॉट मिळाल्या होत्या.
यामध्ये काहींनी जमिनी गेल्या नसतानाही डमी दाखला मिळवून जमिनी व प्लॉटचा लाभ मिळविला.यामध्ये पुनर्वसन एजंटनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना हाताशी धरून त्या प्लॉट व जमिनीची मोठया प्रमाणात विक्री करून कोटयवधी रुपयांची माया जमविली आहे.
कोयना प्रकल्पग्रस्त खातेदारांचे संकलन अद्ययावत करन्याचे काम सुरू असून कोयना प्रकल्पाचे प्रकल्पग्रस्त म्हणून वाटप झालेले जमिन व प्लॉट याबाबत बुडीत क्षेत्रातील निवाडे पाहता वाटपासंबंधी वस्तुस्थिती दिसून येत नसल्याने
तसेच प्रकल्पग्रस्तास एकाहून अधिक शासकीय नियमापेक्षा अतिरिक्त दुबार क्षेत्राचे वाटप झाल्याचे सकृतदर्शनी महसूल विभागाच्या निदर्शनास आले.
दरम्यान, यापुढे ज्या खातेदारांच्या उताऱ्यावर इतर हक्कात हस्तांतरणास बंदी शेरा असेल त्या जमीन व प्लॉटची खरेदी-विक्री होणार नाही असे दुय्यम निबंधक शंकरराव सांगळे यांनी सांगितले.
हस्तांतरणास बंदी शेरा असलेले गवनिहाय खातेदार पुढीलप्रमाणे—
डोणज -8, ब्रम्हपुरी-15, मुंढेवाडी -10,माचणूर-44, रहाटेवाडी-9, मारापूर-1, ढवळस-1, देगाव-2, मल्लेवाडी- 7, मुढवी-10, बठाण-8, उचेठाण-15, घरनिकी-11, तामदर्डी- 12, सिध्दापूर-58, नंदूर-2, तांडोर-67, बोराळे -96, मंगळवेढा-213. आदी शेतकरी आहेत.
अतिरिक्त जमीन व प्लॉट वाटप प्रकरणी केवळ शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारजमा करणे योग्य नाही तर या घोटाळ्यास जबाबदार असणाऱ्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी मोहिनीं चव्हाण व त्यांचे दलाल यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे.
तरच अशा घोटाळेबाजाना चाप बसेल यासाठी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या कार्यालयासमोर पुढील आठवड्यात अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन स्वाभिमानी बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे : युवराज घुले, जिल्हा संघटक स्वाभिमानी शेतकरी संघटना
हस्तांतरणास बंदी शेऱ्याने एजंट व शेतकऱ्यांत खटके
मंगळवेढा तालुक्यात कमी किमतीत धरणग्रस्तांच्या जमिनी व प्लॉट बोगस कागदपत्रे बनवून दलालांनी करोडोचा आर्थिक लाभ मिळवला परन्तु यामध्ये काबाडकष्ट करून जमिनी खरेदी करणार्यामध्ये धाकधूक वाढली आहे.
ज्या एजंटनी जमीन खरेदी करून दिली आहे त्या एजंट च्या घरी शेतकरी जाऊन याबाबत विचारणा करीत आहेत त्यामुळे एजंट व शेतकऱ्यांत खटके उडत आहेत. शेतकऱ्यांच्या ससेमिऱ्याने काही एजंट गायब झाले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज