टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांची जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वि सातपुते यांनी सोलापूर जिल्हा ग्रामीण नियंत्रण कक्षात बदली केली असून त्यांच्या जागी नविन पोलीस निरीक्षक म्हणून रणजीत माने यांची नियुक्ती केली आहे.
दरम्यान नुतन पोलिस निरीक्षक रणजीत माने हे आज मंगळवेढा पोलिस ठाण्यात येवून आपला कार्यभार स्विकारणार असल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले आहे.
कार्यकाल संपल्याने बदली : गुंजवटे
मंगळवेढा पोलिस ठाण्यामध्ये कोरोना काळात दोन वर्षे सक्षमपणे काम केले. नागरिकांना चांगल्या पध्दतीने कायदा, सुव्यवस्था सांभाळण्यासाठी सहकार्य मिळाले.
माझा कार्यकाल संपत आला असल्याने माझी बदली अपेक्षित होती. त्या प्रमाणे माझी बदली झाली आहे असे पो. नि. गुंजवटे यांनी स्पष्ट केले आहे.
या पुढील काळात तालुक्यातील जनतेने पोलिस प्रशासनाला असेच सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. आज नुतन पो.नि.रुजू होणार आहेत.
प्रभाकर देशमुख हे सध्या आंदोलन करत आहेत
मंगळवेढा उपविभागीय पोलीस कार्यालय समोर जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख हे सध्या आंदोलन करत आहेत.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वि सातपुते यांनी मंगळवेढा पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांना मंगळवेढा पोलीस ठाण्यामधून सोलापूर येथील नियंत्रण त्यांची बदली केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज