टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी परिसरात बेकायदा वाळू वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी पकडून वाळूसह 1 लाख 3 हजाराचा मुद्देमाल जप्त करून
वाहनचालक प्रविण अर्जुन इमडे (रा.सावे ता.सांगोला) व अज्ञात एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मागील दोन आठवडयापुर्वी याच परिसरातून वाळूच्या दोन वाहनावर कारवाई न करता ती वाहने सोडून दिल्याने एका पोलिस हवालदारावर निलंबनाची कारवाई पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी केली होती.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,लक्ष्मी दहिवडी परिसरात दि.21 च्या पहाटे बेकायदा वाळू वाहतूक करणारे वाहन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरिक्षक रणजित माने यांना मिळताच त्यांनी
सदर ठिकाणी पोलिस नाईक विठ्ठल विभुते, पोलिस शिपाई हत्ताळी यांना पाठवून खातरजमा केली असता
लक्ष्मी दहिवडी येथील विदयामंदिर शाळेजवळ एक वाहन येत असल्याचे दिसून आले.
सदर वाहनास हात करून थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर चालक व अज्ञात एक इसम वाहन जागेवर सोडून पळून गेले.
पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता ते चिलार झाडीच्या फायदा घेत त्यांनी पलायन केले.
त्या दोघांच्या नावाबाबत आजूबाजूला चौकशी केली असता प्रविण अर्जुन इमडे असे चालकाचे नाव असल्याचे सांगण्यात आले.
तर अन्य एकाचे नाव समजू शकले नाही.पोलिसांनी एक लाखाचे पांढर्या रंगाचे बिगर नंबरचे टाटा कंपनीचे पिक अप व 3 हजार रुपये किमतीची वाळू असा एकूण 1 लाख 3 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याची फिर्याद पोलिस शिपाई सोमनाथ माने यांनी दिल्यावर वरील दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज