टीम मंगळवेढा टाईम्स।
धनश्री परिवाराचे प्रमुख तथा सुरसंगम ग्रुपचे मार्गदर्शक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सुरसंगम ग्रुपच्या पुढाकारातून आज गुरुवार दि.७ मार्च रोजी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
यामध्ये सुरसंगम ग्रुपच्यावतीने मंगळवेढा पोलिस स्टेशनला देण्यात येणाऱ्या बॅरीगेटसचे लोकार्पण, डॉ.शिवाजीराव पवार मित्रमंडळाच्यावतीने ७५ वृक्ष लागवडीच्या कामाचा शुभारंभ,
धनश्री व सिताराम परिवाराच्यावतीने मंगळवेढा बसस्थानक येथे उभारण्यात येणाऱ्या दोन प्रवेशव्दाराच्या शुभारंभ,
सोलापूर प्रशस्त अशा कामाचा रोडवरील स्मशानभूमीत सेवेसाठी असणाऱ्या स्मशानजोगी कुटुंबास धान्य वाटप आदी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
प्रा.शिवाजीराव काळुंगे यांना राज्यस्तरीय स्व. अरुणभैय्या नायकवडी स्मृती पुरस्कार
वाळवा येथील हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय स्व. अरुणभैय्या नायकवडी स्मृती पुरस्कार मंगळवेढ्याचे प्रा. शिवाजीराव काळुंगे यांना 25 हजार रोख, सन्मान चिन्ह, मानपत्र देवून वाळवा येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला.
पद्मभूषण डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांच्या विचारांवर वाटचाल कायम ठेवत समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तीमत्त्वांचा गौरव वाळवा येथील हुतात्मा संकुलाच्या वतीने स्व. अरुणभैय्या नायकवडी यांच्या १९ व्या स्मृती दिनी 24 फेब्रुवारी रोजी हुतात्मा शिक्षण संकुलात हा पुरस्कार प्रदान केला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना हुतात्माचे चेअरमन वैभव नायकवडी म्हणाले, गेल्या 19 वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो.
प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या बरोबरीने पाणी संघर्ष चळवळीत काम केले आहे. गोरगरिबांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटच्या माध्यमातून केलेले काम कौतुकास्पद आहे.
तसेच सीताराम कारखान्याच्या माध्यमातुन शेतकरी व शेतमजूर कष्टकऱ्यांना त्याची देयके वेळेत बिले अदा करून जीवनमान उंचावण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून प्रा. काळुंगे यांना हा पुरस्कार देत असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यानी सांगितले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा. शिवाजीराव काळुंगे म्हणाले, स्व. नागनाथ आण्णांच्या प्रेरनेने कोणताही स्वार्थ न ठेवता तन मन धनाने काम केले. हुतात्मा समूहाने पुरस्कार देवून कौतुकाची थाप पाठीवर दिल्याने अजून समाजासाठी लढण्याचे बळ आले आहे.
आण्णांच्या त्यागामुळे 13 दुष्काळी तालुक्याला पाणी मिळाले आहे. धनश्री, सीताराम परिवाराच्या माध्यमातून समाजासाठी मोठे काम केले. आमच्या घडण्यामध्ये अण्णांचे योगदान मोठे असून त्यांच्या विचारांवर आम्ही सामाजिक, आर्थिक, पाणी चळवळीत काम करत असल्याचे त्यानी सांगितले. यावेळी बोलताना प्रा. शोभाताई काळुंगे यांनी आण्णांच्या आठवणी सांगत आण्णांच्या कार्याची माहिती दिली.
यावेळी हुतात्मा चेअरमन वैभव काका नाईकवाडी, हुतात्मा डेअरीचे चेअरमन गौरव नायकवडी, युवा नेते वीरधवल नाईकवाडी, धनश्रीच्या चेअरमन प्रा, शोभाताई काळुंगे, बाबुराव गुरव, हुतात्माचे कार्यकारी संचालक समीर सलगर, दामाजीचे संचालक राजेंद्र पाटील, दयानंद सोनगे, ज्ञानदेव जाविर, दत्तात्रय पाटील, यादापा माळी, युवराज गडदे, रमेश भांजे, विनोद पाटील, सुनील पाटील, रावसाहेब पाटील, प्रभाकर कलुबर्मे, प्रकाश काळुंगे, विलास सरवळे, अड. भारत पवार, कैलास मसरे, कवी इंद्रजित घुले, दिलीप कलुबर्मे, बाळासाहेब यादव, आदी उपस्थित होते.
पुरस्कारांची रक्कम दिली विद्यार्थ्यांसाठी
प्रा शिवाजीराव काळुंगे यांना यावेळी पुरस्कारात मिळालेल्या 25 हजाराच्या रकमेत प्रा. काळुंगे यांनी स्वतःची 25 हजाराची रक्कम देत पुढील काळात शाळेत चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यासाठी 50 हजाराची रक्कम हुतात्मा शिक्षण समूहाच्या स्वाधीन केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज