मंगळवेढा शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाने सुरुवातीला हाहाकार माजवला होता. कोरोनाला अटकाव घालण्यात प्रशासनाला यश आले आहे.
उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्नील रावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील,डॉ.नंदकुमार शिंदे,डॉ.प्रमोद शिंदे, पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे आदींनी कोरोना व्हायरला रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
बुधवार दि.21 ऑक्टोबर रोजी आलेल्या अहवालानुसार 7 रुग्णांची वाढ झाली आहे तर 7 रुग्णाला घरी सोडले आहे.आत्तापर्यंत 1 हजार 275 रुग्ण कोरोनावर मात करून घरी गेलेले आहेत तर 43 जणांवर उपचार सुरू आहे.
आज दि.21 ऑक्टोबर रोजी 5 नागरिकांचे स्वॅब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत.तसेच आज 33 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट ( RAT ) घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 33 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 7 आणि निगेटिव्ह 26 जणांचे अहवाल आलेले आहेत.
सदरचे नागरिक हे मंगळवेढा 3 , दामाजीनगर 3 , धर्मगांव 1 येथील आहेत. सोलापूर येथे पाठविणेत आलेल्या स्वब ( RT – PCR ) पैकी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त नाहीत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 355 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 1 हजार 275 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 43 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 37 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बंगला विकणे आहे.
मंगळवेढा येथील ३००० चौ.फूट एन.ए.प्लॉट , साधारण ५०० चौ.फूट मध्ये आर.सी.सी. वन बी.एच.के. बांधकाम,बोअरचे मुबलक पाणी , ज्ञानदीप शाळेपासून फक्त ५०० फुट अंतरावर , अपार्टमेंट , बँक , हॉस्पिटल , हॉलसाठी उपयुक्त ठिकाण , कारखाना रोडपासून दोन नंबरचा प्लॉट , दोन रोडटच कॉर्नर प्लॉट योग्य किंमत आल्यास त्वरीत विकणे आहे.
संपर्क:मो.नं.९८९०९८०८७७,९५६१८२११९९
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज