टीम मंगळवेढा टाईम्स ।
दिगवंत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमध्ये असलेल्या राष्ट्रवादीतील गटबाजीचे साडेसाती काही केल्या संपेना असे दिसत आहे.
पदाधिकारी निवडीवरून सुरू झालेले वादविवाद वाढदिवसा पर्यंत सुरू होते. अशातच मंगळवेढा शहर उपाध्यक्ष विक्रम शेंबडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने मंगळवेढ्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला यावरून राष्ट्रवादीत गटबाजी अजून संपली नसल्याचे दिसत आहे.
दि.14 डिसेंबर रोजी मंगळवेढा शहर उपाध्यक्ष पदी निवड झालेले विक्रम शामराव शेंबडे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी यांच्याकडे राजीनामा पाठवला असून त्यात म्हटले आहे की, सदर पदाचे कामकाज व पक्षाच्या कामकाजा करता वेळ माझी घरगुती अडचणी मुळे देऊ शकत नसल्याचे पत्रात म्हंटले आहे.
येणाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद व दामाजी कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीला विजय मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
त्यातच मंगळवेढा राष्ट्रवादीला गटबाजीचे ग्रहण लागल्यामुळे पक्षांतर्गत कुरघोड्या काही मंडळी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज