मंगळवेढा टाईम्स न्युज ।
मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीत थंडी वाढताच राजकीय उकळीही चांगलीच चढली आहे. निवडणूक पुढे ढकलल्याने उमेदवारांच्या खिशाला मोठा चटका बसला. मतदारांना खूश करण्यासाठी दिलेल्या पहिल्या जेवणावळींचं पोटातलं तेल उतरण्याआधीच निवडणूक पुढे गेली आणि आता दुसऱ्या फेरीच्या मेजवान्यांना जोर आला आहे.

मतदारांना पुन्हा रिचार्ज करण्यासाठी चमचमीत नव्या मेनूचे बेत सुरू असून प्रतिष्ठेच्या प्रभागांत थैलीबाज उमेदवारांनी लाखोंची उधळपट्टी करत अटॅम पदार्थांचा वर्षाव सुरू केला आहे.

मतदार प्रभागातील सगळ्याच जेवणावळीला हजेरी लावत आहेत. ‘जिभेचं मतदान’ जिंकण्याची धडपड सुरू असताना मतदारराजा मात्र नऊ वर्षांनी मिळणारी ही राजकीय दिवाळी मनसोक्त एन्जॉय करत आहेत. २१ डिसेंबरला शेवटी मतदार कोणाच्या अन्नाला जागतात याची उत्सुकता आहे.
जेवणावळी, मसाला दूध.. आता पुढे काय ?
मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत मतदारांचे लाड करण्यासाठी उमेदवारांनी अक्षरशः खादाडी स्पर्धाच सुरू केली आहे.

सुरुवात प्रभागनिहाय सामिष भोजनावळ्यांनी झाली. एकाने केली की दुसरा मागे राहणार कसा? पाहता पाहता चमचमीत जेवणाचा धडाका संपूर्ण शहरात पसरला.

आणि जेवणानंतर आली नवी लज्जत, सुगंधी मसाला दूध ! उमेदवारांनी हा कार्यक्रम इतक्या जोरात राबवला की मतदार सुगंधातच धुंद झाले.

आता मंगळवेढ्यातील चर्चा एकच.. “जेवण झालं… दूध मिळालं…. पुढचा स्वाद कोणता?” निवडणुकीची ही ‘खादाडी मोहीम’ सध्या मतदारांमध्ये सर्वाधिक तुफानी चर्चा आहे! एकूणच आता २१ तारखेपर्यंत उमेदवारांना मतदारांचे चोचले पुरविण्यासाठी तारेवरची कसरात करावी लागणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














