मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
मंगळवेढा नगराध्यक्षपदाच्या तीन उमेदवाराच्या अर्जावर असलेल्या हरकतीवर निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव दिलेला निकाल पंढरपूर न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस.सलगर यांनी कायम ठेवला. पण नगराध्यक्षपदाची निवडणूक नियोजित वेळेत की पुढे ढकलणार यावर निवडणूक आयोगाच्या निर्णायाची प्रतिक्षा लागून राहिली.

नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी रागिनी कांबळे यांच्या अर्जावरील व नगरसेवक प्रविण खवतोडे यांच्या अर्जावरील एकच सुचक असून खवतोडे यांचा अर्ज अगोदर तर रागीणी कांबळे यांचा अर्ज नंतर दाखल झाल्याने रद्दबातल ठरवला.

तर सुप्रिया जगताप व सुनंदा अवताडे यांचा अर्ज मंजूर केला. त्या विरोधात पंढरपूर येथील न्यायालयात हरकत घेतली. त्या हरकतीची सुनावणी दोन दिवस चालली.

निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी मी घेतलेला निर्णय कायद्याला धरून आणि दिलेला निकाल हा योग्य असल्याचे म्हणणे सादर केल्यानंतर रागिनी कांबळे यांचा अर्ज रद्द केला असल्याने त्यावर युक्तिवाद करताना अॅड संताजी माने यांनी 2017 साली थेट नगराध्यक्ष पदासाठी नवा निवडणूक कायदा लागू केला.

नगरसेवक पदासाठी जुनाच कायदा अस्तित्वात आहे त्यामुळे दोन कायदे वेगवेगळे असल्याने नगरसेवक व नगराध्यक्ष पदाचा उमेदवार वेगळे आहे. नव्या कायद्यानुसार रागिनी कांबळे यांचा अर्ज ठरवावा वैध ठरवावा.

तर सुप्रिया जगताप या प्राध्यापिका असून त्यांना तीन अपत्य असल्याने त्यांचा अर्ज रद्दबातल करावा असा युक्तिवाद अॅड निलेश ठोकडे यांनी केला त्यावर ॲड संताजी माने यांनी हरकती दरम्यान व सुनावणी दरम्यान दिलेला संस्थेचा पुरावा वेगळा आहे.
जगताप यांनी नोकरीचा राजीनामा 29 ऑक्टोबरला दिलेला मंजूर झाला. तीन आपत्याबाबतचा कोणताही जन्म तारखेचा पुरावा सादर केला नाही केवळ सोशल मीडियातील फोटो वरून घेतलेली हरकत आहे त्यामुळे त्यांचे अपील फेटाळण्यात यावी असा युक्तीवाद मांडला.

तर उमेदवार सुनंदा अवताडे यांच्या मुलाच्या नावे नगरपालिकेत दोन कामे सुरू असून भविष्यात एखाद्या कामा संदर्भात तक्रार आल्यानंतर त्यावर कठोर भूमिका घेण्याबाबत शंका निर्माण होऊ शकते त्यामुळे त्याचा अर्ज रद्द करावा असा युक्तीवाद देखील रागिनी कांबळे यांच्या वतीने अॅड संताजी माने यांनी केला.
परंतु त्या स्वतः ठेकेदार आहेत असा कुठेही पुरावा आलेला नाही तसेच त्यांचा मुलगा व त्यांचे पती यांच्या दरम्यान सन २०१५ मध्ये न्यायालयामार्फत वाटप झालेले आहे त्यामुळे त्यांचे एकत्र हिंदू कुटुंब राहिलेले नाही असा निष्कर्ष काढून हरकत फेटाळली होती असा युक्तिवाद अॅड निलेश ठोकडे यांनी केला.
न्यायालयाने दिलेला निकाल हा लोकशाही वाचावी असा हेतूने दिलेला आहे.विरोधकाने केवळ न्यायालयानीन प्रक्रियेत उमेदवार अडकून राहावा आणि प्रचार करण्यास वेळ मिळू नये अश्या हेतूने याचिका दाखल केलेली आहे.

त्यामुळे तिन्ही उमेदवारावरील हरकतीची सुनावणी काल पूर्ण झाली असून आज दि.27 रोजी त्याबाबत न्यायालयाने निकाल देत निवडणूक निर्णय अधिकाय्रांनी घेतलेला निर्णय कायम ठेवला. ज्यांची अपील आहेत त्या निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात निवडणूक आयोगाचा निर्णय आहे.(स्त्रोत:सकाळ)
वेळेत निवडणूक घेण्याबाबत कळविणार आहे
मंगळवेढ्यात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत अपील होते त्या अपीलाचा निकाल आला आहे याबाबत निवडणूक आयोगाला तात्काळ पत्र पाठवून वेळेत निवडणूक घेण्याबाबत कळविणार आहे.- मदन जाधव, निवडणूक निर्णय अधिकारी



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











