टीम मंगळवेढा टाईम्स । विवाहित महिलेस तिच्या ओळखीच्या लोकांनी तिला जबरदस्तीने जीपमध्ये बसवून गळ्यात हार घालायला लावून लग्न झाले आहे,असे भासवण्याचा प्रयत्न केला असल्याची खळबळजनक घटना मंगळवेढा तालुक्यात घडली आहे.
महमदाबाद ता.मंगळवेढा येथील ३० वर्षीय महिलेस बळजबरीने जीपमध्ये घालून पळवून नेऊन लग्न झाल्याचे भासवले. दि.२१ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मांजरगाव येथील कपिल देशमुख,अजित देशमुख,सतीश व इतर एक अनोळखी इसम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तिचे पती हे घरासमोरील अंगणात झोपले होते. पीडित महिलेच्या ओळखीच्या कपिल देशमुखसह संशयित हे पांढऱ्या रंगाची जीप घेऊन तेथे आले. तिला बळजबरीने हाताला धरून जीपमध्ये घातले.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मांजरगाव येथील एका मंदिरात नेले. तेथे कपिल देशमुख याच्या गळ्यात हार घालायला लावून फिर्यादीचे त्याच्याशी लग्न झाले आहे, असे भासवण्याचा प्रयत्न केला.
तसेच कपिल देशमुख याने तूच माझी बायको आहे, मी तुला सोडणार नाही, तू कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या घरातील लोकांना माझ्या गाडीत असलेल्या तलवारी, कु-हाडीने मारून टाकू,अशी धमकी दिली.
पोलिसांनी संशयितांवर अपहरण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.सहायक फौजदार संजय राऊत तपास करीत आहेत.
Solapur Mangalwedha Kidnapped and married married woman; Crime on all four
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज