टीम मंगळवेढा टाईम्स।
रतनचंद शहा सहकारी बँकेचा धनादेश अनादर झाल्याप्रकरणी आरोपीस नऊ महिने कारावासाची शिक्षा व नुकसान भरपाई देण्याचा आदेश मंगळवेढा न्यायालयाचे फौजदारी न्यायाधीश एस. एन. गंगवाल- शहा यांनी दिला.
गणपत तुकाराम कोळेकर (रा.तळसंगी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. नुकसान भरपाई सहा लाख रुपये त्यावर ८ जून २०१८ पासून दरमहा ६ टक्के व्याज संपूर्ण रक्कमेची परतफेड होईपर्यंत देण्याचेही आदेश नमूद केले आहे.
गणपत तुकाराम कोळेकर यांनी रतनचंद शहा सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. याच्या कर्जाच्या परतफेडीकरिता बँकेस त्यांनी धनादेश दिला होता.
हा धनादेश आरोपीच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे बाऊंस झाला. त्यानंतर बँकेने मंगळवेढा न्यायालयात फिर्याद दाखल केली.
सदरच्या फिर्यादीची चौकशी होऊन आरोपी गणपत तुकाराम कोळेकर यांना न्यायाधीश एस.एन. गंगवाल-शाह यांनी नऊ महिने कारावासाची शिक्षा व नुकसान भरपाई सहा लाख रुपये व ८ जून २०१८ पासून दरमहा ६ टक्के व्याजासह संपूर्ण रक्कमेची परतफेड करण्याचा आदेश दिला.
नुकसान भरपाई न दिलेल्या आणखी सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यात रतनचंद शहा सहकारी बँकेतर्फे फिर्यादी म्हणून श्रीकांत नाझरकर यांनी जबाब दिले. तर बँकेतर्फे अॅड. जावेद डी.मुल्ला यांनी कामकाज पाहिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज