टीम मंगळवेढा टाईम्स ।
अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या दुकानांवर हुलजंती ग्रामपंचायतीच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली आहे. येथील दारूविक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई करत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि ग्रा.पं सदस्य यांच्या उपस्थितीत टाळे ठोकण्यात आले आहे.
यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आला होता. तसेच वेळोवेळी संबंधीत दुकानदारांना नोटिसा देखील देण्यात आले होते. तरी याला न जुमानता तसेच दारू विक्री करत असल्याने आज सोमवार दि. 26 जुलै रोजी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि ग्रा.पं सदस्य यांच्या उपस्थितीत दारू विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करून टाळे ठोकण्यात आले आहे. या कारवाईचे गावातील नागरिकांतून कौतुक होत आहे.
आपल्या गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आपल्याच माता भगिनींचा संसार सुखाचा व्हावा या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे सरपंच मीनाक्षी कुरमुत्ते यांनी संगितले. तसेच यानंतर गावात संपूर्ण पणे दारूबंदी करण्यासंदर्भात कडक पाऊले उचलण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी उपसरपंच बाळासाहेब माळी, ग्रामसेवक एस. बी. शिंदे आणि ग्रा.पं. सदस्य कल्लाप्पा बुरकुल, अर्जुन मल्लाळे, उज्वला बड्डे, मनगेणी पौटे, शिलवंती येड्डे, मंदाकिनी माळी, सविता शिंदे, अनिता भोरकडे, महादेव पेटर्गे, शांतीलाल भोरकडे, मारुती पेटर्गे आदी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज