मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार पुन्हा ६ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या १ हजार ३७३ झाली आहे.
शुक्रवार दि २३ अॉक्टोंबर रोजी ९४ रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. ९४ रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी ५ अहवाल पॉझिटिव्ह तर ८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
सदरचे नागरिक मंगळवेढा-२, दामाजी नगर-२,सलगर-१ येथील आहेत. तसेच शुक्रवारी १५ नागरिकांचे स्वॅब करोना चाचणी साठी घेण्यात आलेले आहेत. सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वॅब चा १ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झालेला आहे. सदरील नागरिक बोराळे येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील आहे.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत १३७३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर १२८३ रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आता पर्यंत ५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे.
शासन प्रशासनाकडून वारंवार खबरदारीच्या उपाययोजना करण्यासंबंधी नागरिकांना सुचविले जात आहे. मात्र अनेक नागरिक अजूनही हलगर्जीपणा दाखवत आहेत. त्यांच्यामुळेच कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे.
झपाट्याने वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पोलिसांनी आता अशा निष्काळजी नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा पवित्रा घेतला आहे.तरी नागरिकांनी करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे.
बंगला विकणे आहे.
मंगळवेढा येथील ३००० चौ.फूट एन.ए.प्लॉट , साधारण ५०० चौ.फूट मध्ये आर.सी.सी. वन बी.एच.के. बांधकाम,बोअरचे मुबलक पाणी , ज्ञानदीप शाळेपासून फक्त ५०० फुट अंतरावर , अपार्टमेंट , बँक , हॉस्पिटल , हॉलसाठी उपयुक्त ठिकाण , कारखाना रोडपासून दोन नंबरचा प्लॉट , दोन रोडटच कॉर्नर प्लॉट योग्य किंमत आल्यास त्वरीत विकणे आहे.
संपर्क:मो.नं.९८९०९८०८७७,९५६१८२११९९
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज