मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
मंगळवेढा शहरात एका २४ वर्षीय तरुणाने अज्ञात कारणावरुन राहते घरातील अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेची मंगळवेढा पोलीसात नोंद झाली
आहे. पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, दि. १७ रोजी दुपारी १२ च्या पुर्वी यातील मयत नागराज गुंडोपंत कोंडूभैरी (वय २४, रा. कोंडूभैरी गल्ली, मंगळवेढा शहर) येथील राहत्या घरी सदर

तरुणाने अज्ञात कारणावरुन पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून मयत झाला असल्याची

खबर कैलास अनपट (रा. मारापूर) यांनी पोलीसात दिली आहे. या मयताचा अधिक तपास पोलीस हवालदार दत्तात्रय व्हरे हे करीत आहेत.

दरम्यान, नागराज कोंडूभैरी या तरुणाने नेमकी कोणत्या कारणांसाठी आत्महत्या केली आहे यासंदर्भात मंगळवेढा पोलिसांकडून कसून तपास करण्यात येणार आहे.

मारापूर येथून २८ वर्षीय पती बेपत्ता झाल्याची पत्नीची पोलिसात तक्रार
मंगळवेढा तालुक्यातील मारापूर (वय २८) वर्षे हे घरातून कोणास काही न सांगता कोठेतरी निघून गेले असून ते अदयापपर्यंत घरी आले नसल्याने त्यांचा शोध व्हावा अशी तक्रार त्यांच्या पत्नीने मंगळवेढा पोलिसात दिली असून पोलिस त्या पतीचा कसून शोध घेत आहेत.

यातील खबर देणारे स्वप्नाली सकट वय २५ वर्षे, ही सदर तरूणाची पत्नी असून दि.२८ दुपारी १.०० च्या दरम्यान खबर देणाऱ्याचे पती कामाजी सकट हे कोणास काही न सांगता मारापूर येथील राहत्या घरातून कोठेतरी निघून गेले आहेत ते अदयापर्यंत घरी आले नाहीत.

त्यांचा शोध होवून मिळणेस पोलिस प्रशासनास विनंती केली आहे. त्याचे वर्णन पुढील प्रमाणे उंची ५.५ इंच, रंग सावळा, अंगात वांगीची कलरचा भाषा पँट, शरीर बांधा सडपातळ, शिक्षण बी.ए. उजव्या हातावर २६११ असे लिहिलेले,
बोली मराठी अशा वर्णनाचा तरूण कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी तपासिक अंमलदार पोलिस नाईक ईश्वर दुधाळ (मोबा. ९३२५०८४०४२) या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










