टीम मंगळवेढा टाईम्स।
सध्या मोबाईलवर ५ जी नेटवर्कच्या अनुषंगाने कॉल येत असून ओटीपी मागून फसवणूक होत असून ही फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन मंगळवेढ्याचे पालीस निरीक्षक रणजित माने यांनी केले आहे.
पुढे बोलताना रणजीत माने म्हणाले की, आपल्या देशामध्ये मोबाईल सिमकार्ड ५ जी सेवा सुरु झाली आहे, सिमकार्ड ५ जी ही सुविधा आपणांस आधीच आहे. सायबर गुन्ह्यातील काही बदमाश तुमच्या मोबाईलवर कॉल करतील
आणि तुम्हाला तुमचे सिम कार्ड ४ जी वरून ५ जी वर करायचे आहे आणि ते करण्यासाठी अपडेट करावे लागेल नंतर तुम्हाला एक ओटीपी मिळेल तो ओटीपी देऊ नका.
तुम्ही त्यांना पाठवलेला ओटीपी नंबर सांगितल्यास ते तुमच्या बँक खात्यातील सर्व पैसे त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करतील, त्यामुळे कोणीही अनोळखी व्यक्तीने ओटीपी मागितल्यास ते सांगू नका.
कृपया ही माहिती इतरांना शेअर करु नका आणि आपली फसवणूक होण्यापासून सुरक्षित रहावे असे आवाहन रणजित माने यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज