मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा येथील पोलिस ठाण्याचा पदभार प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी नयोमी साटप यांनी स्वीकारल्यापासून तालुक्यात धंद्यांवरील कारवाईला वेग आला आहे.
मंगळवेढा शहरातील दुकानात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी आपली गाडी योग्य ठिकाणी पार्क करावी, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे फर्मान मंगळवेढा पोलिसांनी काढले आहेत.
दरम्यान, काल आठवडा बाजार दिवशी रस्त्यावर बेशिस्त वाहन लावणाऱ्या ४८ वाहनांवर कारवाई करत २७ हजार रुपयांचा दंड एका दिवसात वसूल करून दुचाकी वाहनधारकांना धक्का दिला.
येथील आठवडा बाजारासाठी शहरासह ग्रामीण भागाबरोबर पंढरपूर, सांगोला, चडचण, मोहोळ या भागातील व्यापारी, शेतकरी व खरेदीदार येत असतात. येथील बाजारपेठेतील व्यापारी हे अस्ताव्यस्त बसलेले असतात.
गर्दीचे स्वरूप व खरेदीदार वाढल्यामुळे रस्त्यावर लावलेल्या दुचाकींचा सामना ग्राहकांना करावा लागतो. त्यामुळे याच मार्गावरून शहरातून बस स्थानकाकडे जाणाऱ्या अन्य वाहनधारकांना अडचणी सहन कराव्या लागत आहेत.
परंतु याकडे कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांतून नाराजीचा सूर अवैध व्यक्त होत होता. मात्र, येथील प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी नयोमी साटम यांनी शहरातील अनेक अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका चालूच ठेवता आहे.
त्याचप्रमाणे रस्त्यावर बेशिस्त वाहने लावणाऱ्या दुचाकीस्वारांवर केलेल्या कारवाईत २७ हजार रुपयांचा दंड वसूल केल्यामुळे बेशिस्त वाहने लावणाऱ्या वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली
या कारवाईत कायमस्वरूपी सातत्य ठेवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. ही कारवाई प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सौरभ शेटे, वाहतूक शाखेचे पोलिस नाईक शिवाजी पांढरे व शिपाई काळेल यांनी केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज