मंगळवेढा टाइम्स न्युज टीम ।
आपण आपल्या ठरवलेल्या क्षेत्रामध्ये पूर्ण आत्मविश्वासाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने मार्गक्रमण केल्यास आपण निश्चित केलेले ध्येय साध्य होण्यासाठी वेळ लागत नाही.
अशाच पद्धतीने जिद्द व चिकाटीच्या जोरावर मंगळवेढ्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश खंदारे यांनी गोव्यामध्ये सुरू केलेला हॉटेल व्यवसाय हा इतर तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले,
मंगळवेढया सारख्या ग्रामीण भागातून गोवा राज्यात येऊन उद्योग सुरू केल्याने प्रकाश खंदारे यांचे कार्य तरूणांसाठी प्रेरणादायी आहे.
सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक प्रकाश खंदारे यांनी गोवा येथील मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली असता यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश खंदारे यांनी गोवा या राज्यात हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण केले आहे. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने गोव्यातील पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिले आहेत.
हॉटेल व्यवसाय यशस्वीरित्या सुरू असून त्यांनी आता गोव्यामधील पार्किंगचे टेंडर मिळण्याची मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.
कलंगुड शहर, पणजी शहर, मडगाव आदि ठिकाणचे पार्किंगचे टेंडर मिळण्यासाठी मागणी केली असून या टेंडर मुळे अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे.
उद्योग लहान किंवा मोठा असे काही नसते. त्यासाठी केवळ कामाशी प्रामाणिकता असावी लागते. एकदा ते जमले की यश मिळत जाते. काम करताना कठोर परिश्रम घ्यावे व स्वतःमधील कर्तृत्व, क्षमता, कौशल्य ओळखायला आपण शिकले पाहिजे.
हे जमले की त्या पुढील आवाहने स्वीकारूण काम करता येते व यशही नक्की मिळत जाते. याच गुणांचा अवलंब करून मी गोव्यामध्ये हटिल व्यवसाय सुरू केला आहे. यासाठी मला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले- प्रकाश खंदारे, हॉटेल व्यवसायिक, गोवा
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज