टीम मंगळवेढा टाईम्स।
समाजातील विविध ज्वलंत विषयांवर परखडपणे व पहाडी आवाजात भाष्य करणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते प्रा.वसंत हंकारे यांचे ‘बाप समजून घेताना’ या विषयावर इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे
आज सोमवार दि.२५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०९:०० वाजता व्याख्यान होणार आहे. शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित
हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, संस्थेच्या अकॅडमिक अॅडमिनिस्ट्रेटर डॉ. मिनाक्षी कदम, सचिव प्रियदर्शनी महाडिक, संचालिका व उपप्राचार्या प्रा. तेजस्विनी कदम, सहसचिव श्रीधर भोसले, संचालिका अजिता भोसले,
संचालक यतिराज वाकळे, राम नेहरवे, अॅड. शिवाजी पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाखांचे पदाधिकारी तसेच समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
प्रा. वसंत हंकारे यांचे हे हृदयस्पर्शी व्याख्यान सर्वांसाठी प्रेरणादायी व आनंदाची मेजवानी आहे. तसेच आजचे हे व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे त्यामुळे मंगळवेढा शहरातील नागरिक,
सर्व शाळांमधील विद्यार्थी तसेच पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज मंगळवेढा या प्रशालेचे प्राचार्य रवींद्र काशीद यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज