टीम मंगळवेढा टाईम्स ।
सा.मंगळवेढा वेधचा 7 वा वर्धापन दिन सोहळा व विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या गुणीजनांचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि. 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.15 ला श्रीराम मंगलकार्यालय येथे होणार असल्याची माहिती संपादक शिवाजी केंगार यांनी दिली.
मंगळवेढा तालुक्यातील शासकीय सेवेतील, कर्मचारी, विविध क्षेत्रात कार्यरत असलेले पदाधिकारी तसेच आदर्श माता, आदर्श युवा चेतना समाजरत्न, आदर्श सहकार क्षेत्र, आदर्श दुध संकलन विभाग,आदर्श पत्रकार विभाग यासह कोरोना संकट काळात केलेले दखलपात्र कार्य म्हणून कोविड योध्दा पुरस्कारने तसेच संघर्षमय राजकारणात निष्ठेने व स्थिरतेने राहून समाजासमोर प्रेरणात्मक केलेल्या कार्याबदद्ल स्व.भारतनाना भालके यांच्या स्मरणार्थ आदर्श संघर्षशील राजकीय योध्दा म्हणून पहिल्यांदाच पुरस्कार रूपाने गौरविण्यात येणार आहे.
वर्धापन सोहळा व पुरस्कार वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रकाश शेंडगे, दामाजी शुगरचे चेअरमन समाधान आवताडे, विठ्ठल शुगरचे भगीरथ भालके, जिल्हा परिषद सोलापूरचे माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील, होलार समाजाचे राष्ट्रीय नेते ज्ञानदेव जावीर, राष्ट्रवादीचे नेते लतिफभाई तांबोळी, भटक्या विमुक्त जाती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले,होलार समाजाचे प्रदेश अध्यक्ष नंदकुमार केंगार, मंगळवेढा मार्केट कमिटीचे चेअरमन सोमनाथ आवताडे, युवा नेते प्रणव परिचारक यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहूल शहा, दामाजीचे माजी चेअरमन प्रा.शिवाजीराव काळुंगे, अॅड.नंदकुमार पवार, मिस्टर सभापती सुधाकर मासाळ,माजी सभापती संभाजी गावकरे, नगरपालिकेचे पक्षनेते अजित जगताप,उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले,विजय खवतोडे, होलार समाजाचे राज्य संघटक प्रा. मधूकर भंडगे,जिल्हयाचे अध्यक्ष पांडूरंग गेजगे,मंगळवेढा पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान फुगारे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्काराचे मानकरी रामचंद्र मळगे- स्व.भारतनाना भालके स्मरणार्थ आदर्श संघर्षशील राजकीय योध्दा,फुलाबाई भोसले-आदर्श माता, नंदकुमार कोष्टी, आदर्श शाखा अभियंता, प्रमिला मारूती बाबर -आदर्श चेअरमन पतसंस्था, गजानन पाटील -आदर्श युवा चेतना समाजरत्न, रणजित लेंडवे -आदर्श आरोग्यसेवक, राजाराम देवकते- आदर्श पदविधर शिक्षक, नाथा ऐवळे- समाजभूषण,
धनाजी गावकरे-आदर्श चेअरमन दुध संस्था, डॉ.सुहास सलगर-आदर्श पुशधन विकास अधिकारी,प्रमोद बिनवडे-आदर्श सा.संपादक,सुभाष भजनावळे- आदर्श कृषी सहाय्यक, भागवत मासाळ-आदर्श वनरक्षक, अनिल कोळेकर आदर्श ग्रामसेवक, हरीदास सलगर आदर्श पोलिस नाईक, राजू बनसोडे- आदर्श मंडल अधिकारी, शिवानंद कोळ- आदर्श शिक्षक, दत्तात्रय सरगर-आदर्श साहित्यरत्न,डॉ.ब्रम्हानंद कदम- कोविड योध्दा विशेष सत्कार.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज