टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भा.ज.पा तर्फे सेवा कार्य करत ‘सेवा पंधरवडा’ म्हणून साजरा केला जाणार आहे.
आज दि.१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२२ हा पंधरवडा ‘सेवा पंधरवडा’ म्हणून विविध उपक्रम भा.ज.पा तर्फे कार्यकर्ते करणार आहेत.
दि.१७ सप्टेंबर २०२२ रोजी आ.समाधान आवताडे, आ.प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे व जिल्हासरचिटणीस शशिकांत चव्हाण यांचे प्रमुख उपस्थितीत मंगळवेढा येथील शिशुविहार येथे सकाळी 10 वाजता भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
मंगळवेढा भा.ज.पा तर्फे मोदीजींच्या वाढदिवसानिमित्ताने नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. त्या योजना राबविण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून जगतामध्ये अग्रेसर होत आहे. देशांमध्ये विविध लोकोपयोगी उपक्रम अंत्योदयाचे सूत्र लक्षात घेऊन मोदिजींच्या शासनाने राबवले आहेत. थेट लाभार्थीपर्यंत लाभ पोचवण्यासाठी डिजिटल तंत्राचा वापर होत आहे.
गेली ८ वर्ष सुशासनाची वर्ष असे वर्णन योग्य असल्याची जनमानसात भावना आहे. त्यामुळे मोदिजींच्या वाढदिवसाचे निमित्ताने आयोजित सेवा उपक्रमात जनतेनेही स्वेच्छेने सहभागी व्हावे असे आवाहन मंगळवेढा भा.ज.पा ने केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज