mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची चित्रफीत पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदर्शित; शेतकरी लवकरच शेतात पाणी पाहणार; आ.आवताडेंचा शब्द; पहिल्या टप्प्यात ‘या’ गावांना मिळणार लाभ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 4, 2024
in मंगळवेढा
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची चित्रफीत पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदर्शित; शेतकरी लवकरच शेतात पाणी पाहणार; आ.आवताडेंचा शब्द; पहिल्या टप्प्यात ‘या’ गावांना मिळणार लाभ

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील ऐतिहासिक मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार असून या योजनेच्या माहितीची चित्रफीत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सोलापूर येथे प्रदर्शित करण्यात आली.

यावेळी आमदार समाधान आवताडे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अधीक्षक अभियंता बगाडे, कार्यकारी अभियंता नारायण जोशी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर अंकुश पडवळे पांडुरंग चौगुले यांचेसह  24 गावातील पदाधिकारी उपस्थित होते.

मंगळवेढा तालुक्यातील 24 गावच्या उपसा सिंचन योजनेच्या कामाला मंजुरी मिळवण्याचा ऐतिहासिक निर्णय समाधान आवताडे यांनी पाठपुरावा करून घेतला असून त्यांच्या या प्रयत्नामुळे तालुक्यातील शेतकरी शेतात लवकरच पाणी पाहणार आहेत,

लवकरच या योजनेचे भूमिपूजन करण्यात येणार असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल असे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. ही चित्रफीत प्रदर्शित करताना यामध्ये योजनेची पूर्ण माहिती दर्शविण्यात आली आहे.

या योजनेचा एकूण खर्च 697 कोटी 71 लाख रुपये येणार असून 17,187 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे तीन पंपग्रहाद्वारे पाणी उचलण्यात येणार असून पहिला टप्पा गुंजेगाव, दुसरा टप्पा लक्ष्मी दहिवडी व तिसरा टप्पा गोणेवाडी असे तीन ठिकाणाहून प्रत्येकी चार पंपाद्वारे पाणी उचलण्यात येणार आहे.

यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये लक्ष्मी दहिवडी, शेलेवाडी व आंधळगाव येथील निम्मा परिसर ओलिताखाली येणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित आंधळगाव, लेंडवे चिंचाळे, खुपसंगी, गोणेवाडी, शिरशी या गावांना पाण्याचा लाभ मिळणार आहे.

तर तिसऱ्या टप्प्यांमध्ये जुनोनी, पाटकळ, खडकी, मेटकरवाडी, नंदेश्वर, रड्डे, भोसे, सिद्धनकेरी, निंबोणी, जित्ती, खवे, तळसंगी, यड्राव, भाळवणी, जालिहाल, हाजापूर, हिवरगाव, डोंगरगाव या गावांना तिसऱ्या टप्प्यामधून नलिका निहाय क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम यामध्ये पोहोच कालवा, पंपगृह, कळ यंत्र, नलिका व शेलेवाडी येथील गुरुत्वीय नलिका व त्यावरील वितरण व्यवस्था कामाची निविदा काढण्यास शासनाची मान्यता मिळाली असून

पहिल्या टप्प्यातील सर्व तांत्रिक मान्यता घेऊन कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे या पहिल्या टप्पा क्रमांक एक अंतर्गत शेलेवाडी गुरुत्वीय नलिका द्वारे 2068.79 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

तर उर्वरित टप्पा क्रमांक दोन व तीनच्या निविदा काढण्याची परवानगीचा प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्यात आला आहे त्याला लवकरच तांत्रिक मान्यता मिळवून टप्पा दोन व तीन ची निविदाही तात्काळ काढून सर्व काम एकाच वेळी सुरू करणार असल्याचे यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.

यावेळी मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांमधील पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते यामध्ये सभापती प्रदीप खांडेकर,खुपसंगी येथील जयराम आलदर,नंदेश्वर येथील अशोक चौंडे भारत गरंडे,आंधळगाव येथील सुरेश भाकरे, येड्रावचे चंद्रकांत गोडसे, लक्ष्मी दहिवडी येथील धनंजय पाटील यांचेसह भाजपचे जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण तालुका अध्यक्ष अंबादास कुलकर्णी युवक जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव राजू पाटील,संजय पाटील,गावचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

**********************

मृगजळ वाटणारी योजना प्रत्यक्षात भूमिपूजनापर्यंत आणली

या योजनेसाठी आम्ही खूप पाठपुरावा केला मतदानावर बहिष्कार टाकला गावे बंद केली दिवंगत आमदार भारत नाना भालके यांनी यामध्ये लक्ष घालून योजनेची पायाभरणी केली होती मात्र त्यांचा जाण्याने पुन्हा आम्ही खचलो होतो मात्र आमदार समाधान आवताडे यांनी प्रयत्न करून या योजनेची प्रत्यक्षात मुहूर्तमेढ रोवली व मृगजळ वाटणारी योजना प्रत्यक्षात भूमिपूजनापर्यंत आणली आहे लवकरच आमच्या शेतात पाणी दिसेल असं आता वाटू लागला आहे.-पांडुरंग चौगुले शेतकरी, भाळवणी

***************

योजना मंजूर झाल्याने ओसाड पडलेल्या माळरानावर लवकरच हिरवळ पहावयास मिळेल

ही उपसा सिंचन योजना व्हावी यासाठी अनेक आंदोलने झाली येथील गावांनी आम्हाला कर्नाटकात जोडा अशी ही मागणी केली जनरेटा व लोकप्रतिनिधींची ताकत यामुळे ही योजना लवकरच पूर्णत्वास जाईल अशी आशा आहे ही योजना मंजूर झाल्याने ओसाड पडलेल्या माळरानावर शेतकऱ्यांना लवकरच हिरवळ पहावयास मिळेल.- अंकुश पडवळे कृषिभूषण शेतकरी

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा उपसा सिंचन योजना

संबंधित बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 17, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
Next Post
शेतकाऱ्यांची सुटका! घर बसल्या आपल्या मोबाईलवरून करा पिक नोंदणी; आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

शेतकऱ्यांनो! महसूल पंधरवडा अंतर्गत आज आंधळगाव येथे कृषी मार्गदर्शन कार्यक्रम; स्वतःची शेती कशी डेव्हलप करावी? सेंद्रिय शेती बाबत फायदेशीर व्याख्यान

ताज्या बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 17, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..