टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी हरकती घेतलेल्या 96 अर्जातील सत्ताधारी गटाच्या हरकती मान्य करण्यात आल्या तर विरोधी समविचारी गटातील हरकती फेटाळण्यात आल्या.
सत्ताधारी गटाला आव्हान देणाऱ्या समविचारी गटाच्या प्रबळ उमेदवाराचे आव्हान छानणीतच संपुष्टात आले.
या निवडणुकीसाठी 412 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले छाननी दरम्यान तीन उमेदवाराचे बाद झाले तर कारखान्याला सलग तीन वर्षे ऊस पुरवठा केला नाही या कारणास्तव समविचारी गटाच्या उमेदवारावर वेगवेगळ्या लोकांनी हरकती घेतल्या होत्या
तर सत्ताधारी गटाच्या उमेदवारावर शहरातील एका संस्थेच्या कर्जाची थकबाकी असल्यावरून हरकत दाखल करण्यात आली.
हरकतीमुळे सत्ताधारी गटासह समविचारी गटामध्ये खळबळ उडाली.हरकती बाबत खुलासा सादर करण्यासाठी त्यांची मोठी पळापळ झाली.
याबाबतची सुनावणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर यांच्याकडे होऊन याबाबत पात्र झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.
1) मंगळवेढा ऊस उत्पादक गटात सत्ताधारी आ.समाधान आवताडे,राजेंद्र सुरवसे, लक्ष्मण जगताप यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला.
तर अजित जगताप राहुल शहा,चंद्रशेखर कौडूभैरी, सोमनाथ बुरसे, विजय खवतोडे, ज्ञानेश्वर भगरे, रामचंद्र वाकडे,राजेंद्र हजारे, संजय कट्टे, यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले.
2) मरवडे गट बसवेश्वर पाटील, अशोक केदार,बापू शिंदे, दगडू पवार, दौलत माने, विजय माने यांचे अर्ज वैध तर संभाजी लवटे, बसवंत पाटील,ईश्वर येजगर, पार्वती खांडेकर, नितीन पाटील, धन्यकुमार पाटील, श्रीमंत केदार,शशिकांत बुगडे, सुरेश कोळेकर, हनुमंत दुधाळ, दामोदर देशमुख, यांचे अर्ज अवैध ठरले.
3) भोसे गट रामकृष्ण चव्हाण अंबादास कुलकर्णी लक्ष्मण नरोटे उमाशंकर कलशेट्टी यांचे अर्ज वैध तर महेश टिक्के ,सिद्धेश्वर कलशेट्टी, तिप्पांना माळी,बंडू करे, गुलाब थोरबोले, रामचंद्र जाधव, तानाजी काकडे,कामण्णा हेगडे सुखदेव डोळ्ळे त्यांचे अर्ज अवैध ठरले.
4) आंधळगाव गट सुरेश भाकरे आनंद बिले बाळासो शिंदे सत्यवान लेंडवे बळवंत पाटील प्रकाश पाटील यांचे अर्ज वैध तर प्रकाश जुंधळे, सोपान मेटकरी यांचे अर्ज अवैध ठरले.
5) ब्रह्मपुरी उत्पादक गट :- राजू बाबर, राजेंद्र पाटील, सचिन चौगुले, जालिंदर व्हनुटगी, यांचा वैध तर मल्लिकार्जुन भांजे, संतोष शेंडगे, सुनील डोके, सुरेश आसबे, विनोद पाटील, विठ्ठल आसबे, रंजना आसबे,अमोगसिध्द पाटील, संजय कवचाळे हे अवैध ठरले.
संस्था मतदारसंघांमध्ये जगन्नाथ रेवे व उमाकांत कनशेट्टी यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला
मागासवर्गीय मतदार संघात विजय खवतोडे प्रवीण खवतोडे प्रशांत साळे भिमराव कांबळे यांचे अर्ज वैध ठरविण्यात आले
तर महिला मतदार संघात घेतलेल्या हरकती फेटाळत त्यांचे अर्ज देखील वैध ठरवण्यात आले.(स्रोत:सकाळ)
विरोधकाला कुमकुवत करण्याचा प्रयत्न
छाननी दरम्यान खोट्या तक्रारी करून विरोधकाला कुमकुवत करण्याचा प्रयत्न केला अर्ज अवैध ठरल्या प्रकरणाबाबत साखर संचालकाकडे तक्रार करणार असून कराडच्या साखर कारखान्याबाबत कोरोना काळात ऊस गेला नसला तरी अपात्रता समजू नये या उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत जोडली. तरीही सत्ताधाय्रांना आव्हान समविचारीतून देणार आहे. –अँड.नंदकुमार पवार,मा. अध्यक्ष दामाजी कारखाना
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज