मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
कडब्याच्या गंजीला लागलेल्या आगीत विवाहित मुलीचा झालेला मृत्यू संशयास्पद असल्याची खबर मुलीचे वडिलांनी पोलिसांना दिली होती. यावरुन मंगळवेढा पोलिसांनी विवाहिता किरण नागेश सावत (वय २२) हिचा अकस्मात मृत्यू झाल्याची सोमवारी नोंद घेतली.
परंतु सायंकाळी ती कराड येथे जिवंत असल्याचे तपासात समोर आल्याने घटनेला धक्कादायक वळण लागले आहे. आगीत मृत्यू कोणाचा झाला, यासंदर्भातील तपास पोलिसांनी सुरु केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी,

खबर देणारे दशरथ दांडगे यांची मुलगी किरण (वय २२) हिचे फेब्रुवारी २०२२ मध्ये पाठखळ येथील नागेश दिगंबर सावत यांच्या सोबत विवाह झाला. त्यांना आरोही (वय २) ही मुलगी आहे. लग्नापासून मुलगी किरण व नागेश सावत आणि तिच्या सासरी (सावत वस्ती, पाठखळ ता. मंगळवेढा) पती नागेश सावत, मगळवेढा) सासु संगीता सावत, सासरे दिगंबर सावत, तसेच चुलत सासरे दत्तात्रय सावत यांच्यासह राहण्यास आहे.

दि. १४ जुलै २०२५ रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची मुलगी किरण हिचे चुलत सासरे दत्तात्रय सावत यांचा फिर्यादीला फोन आला. त्यांनी, तुमची मुलगी किरण हिने पेटवून घेतले आहे, तुम्ही या असे कळविले. त्यावर लागलीच पहाटे ४.१५ वा.चे सुमारास मुलगी किरण हिच्या सासरच्या घरी पाठखळ येथे माहेरची मंडळी आली. तेथे लोकांची गर्दी जमा झाली होती.

जावायी नागेश सावत यांनी किरणने पेटवून घेतले असे म्हणून सास-यांच्या गळ्यात पडून रडू लागला. घराच्या समोर पूर्वेला काही अंतरावर कडब्याच्या गंजीला लागलेल्या आगीमुळे गंज पूर्ण जळून खाक झाली होती, घूर निघत होता.

त्या जळालेल्या गंजीमध्ये पश्चिमेकडील बाजूस एका महिलेचा मृतदेह पूर्णपणे भाजलेल्या अवस्थेत मयत स्थितीत आम्हाला दिसला. दरम्यान या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली असून तपासातही मंगळवेढा पोलिसांसमोर आव्हान आहे.


महिलेच्या मृतदेहाचे अवशेष फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले
तो मृतदेह आम्ही बारकाईने पाहिला. असता सदरचा मृतदेह ओळखण्या पलिकडे होता. सदरची मयत ही माझी मुलगी असल्याचे दशरथ दांडगे याने सांगितले. माझी मुलगी किरण सावत हिस कोणी व कशाने मारले, याची चौकशी करुन दोषीवर कायदेशीर कारवाई, करावी, अशी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली. महिलेच्या मृतदेहाचे अवशेष शवविच्छेदनासाठी व राख सोलापूर येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आली आहे.

मृताची ओळख पटवणे आव्हान
फॉरेन्सिक लॅबकडे घटना स्थळाची राख, मयत झालेली महिला ही सायंकाळी कराड येथे असल्याचे मंगळवेढा पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांचे पथक कराड येथे पोहोचले. रात्री उशिरा मंगळवेढ्यात किरण सावत या महिलेला पोलिस मंगळवेढ्यात घेऊन आले.

मात्र गंजीमध्ये पेटून मयत झालेली महिला कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. डीएनए तपासानंतर व फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर मयत झालेल्या महिलेची ओळख पटू शकेल असे पोलिसांनी सांगितले. (स्रोत:दिव्य मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










