टीम मंगळवेढा टाईम्स ।
सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यावेळी मंगळवेढ्यातील विद्यार्थिनीनं चांगले गुण मिळवत यश मिळवलं आहे.
मंगळवेढ्याच्या साक्षी सुहास बाबर या विद्यार्थिनीने दहावीत 97.40 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केलं आहे. या यशाबद्दल तिच्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रचंड मेहनत, कष्ट करण्याची तयारी आणि ध्येयाने झपाटून केलेल्या अभ्यासामुळेच तिला हे यश मिळाल्याचं सांगताना आई वडीलाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. साक्षीचे वडील भोसे ता.मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूल शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
साक्षीला 500 पैकी 487 गुण मिळाले आहेत. मराठी या विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. इंग्रजी 94, गणित 99 आणि सोशल सायन्स 98 असे गुण मिळवले आहेत.
साक्षीचे शिक्षण 5 वी ते 7 वी मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूलमध्ये झाले आहे. त्यानंतर ती जवाहर नवोदय विद्यालय, पोखरापूर मध्ये तिने दहावी सीबीएसईचे शिक्षण घेतले आहे.
सीबीएसई बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षेचा निकाल लागला असून भविष्याचा मार्ग या निकालावर अवलंबून असल्याने विद्यार्थी आणि पालक या निकालाकडे नजरा लागल्या होत्या.
साक्षीने या यशाचे श्रेय आई वडील, शिक्षक आणि नातेवाईकांना देत त्यांचे आभार मानले आहेत. साक्षीने आत्तापर्यंत अनेक स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे.
साक्षीला मिळालेलं हे यश पाहून साक्षी आणि तिचे आई वडील अतिशय आनंदी झाले आहेत. साक्षीच्या आईवडिलांनी बोलताना सांगतलं की, साक्षीला आम्ही कधी अभ्यास कर असे सांगितलंच नाही. तिने या यशासाठी भरपूर मेहनत घेतली. हे सांगताना आपल्याला साक्षीचा अतिशय अभिमान असल्याचे तिच्या आई-वडिलांनी सांगितलं आहे.
साक्षीच्या यशाबद्दल आमदार समाधान आवताडे, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड.सुजित कदम, भोसे इंग्लिश स्कूलचे प्राचार्य जयराम अलदर, एस.पी. इलेक्ट्रिकल्स अँड गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर संतोष पवार यांनी अभिनंदन केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज