टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात घडलेल्या चोरीच्या प्रकरणात तीन गुन्हे उघडकीस आणण्यास मंगळवेढा पोलीसांना यश आले असून या प्रकरणात रोख रक्कम व तीन दुचाकी, विधीसंघर्ष बालकासह चौघांना ताब्यात घेतले.
या प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की, 24 मार्च 22 रोजी मंगळवेढा सोलापूर महामार्गावर सुगरण हॉटेलच्या पुढील रानातील झाडाखाली चौघांनी राकेश भिमराव लोहार व माणिक लक्ष्मण टोणपे (रा हुपरी जि कोल्हापूर)
यांना बोलावून स्वस्त सोने देण्याचा बहाण्याने मारहाण करुन खिशातील रोख रक्कम 70 हजार चांदीची आंगठी, चांदीचे कडे,असा 72 हजार 500 रु ऐवज चोरुन नेला होता.
या प्रकरणाचा तपास सुरु असताना प्रमुख आरोपी बबलु पपल्या शिंदे व वैदयकिनी बबल्या शिंदे हे (दोघे खडकी ता.मंगळवेढा) व नारायण शितोळया भोसले (रा.धर्मगाव ता मंगळवेढा) यांना अटक करुन रोख रक्कम 10 हजार व
गुन्हयात वापरलेली 40 हजार रु किंमती बजाज पल्सर कंपनीची मोटरसायकल, असा 50 हजाराचा ऐवज हस्तगत केला. त्यातील एक जण फरार आहे.
दुसऱ्या दुचाकी चोरीच्या घटनेत सुरेश पांडूरंग साळसकर (रा.अकोला) यांची रानात लावलेली स्पेल्डंर दुचाकीचा हॅडललॉक तोडून नेण्यात आली.
तर विठठल बाळासाहेब पाराध्ये (रा.बठाण) यांची स्पेल्डंर दुचाकी डॉ.कुंभारे यांच्या दवाखान्यासमोरुन नेण्यात आली.
या प्रकरणाचा तपास करुन विधीसंघर्षग्रस्तास ताब्यात घेवून चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
पोनि रणंजित माने यांनी पदभार घेतल्यानंतर चोरीच्या प्रकरणाचा तपास होऊन मुददेमाल व आरोपी सापडू लागल्याने नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे.
चोरीच्या प्रकरणातील तपासाची ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील पो नि रणजित माने सपोनी सत्यजित आवटे सपोफौ सलिम शेख पोहकॉ तुकाराम कोळी, पो.ना. दयानंद हेंबाडे, पो.ना. सचिन बनकर, पो.ना. कृष्णा जाधव, पो कॉ कैलास जगदाळे यांनी पार पाडली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज