टीम मंगळवेढा टाईम्स।
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर चाळीस धोंडा येथे पोलिसांच्या तपासणी नाक्यावर मंगळवेढा पोलिसांचे पथक तपासणी करीत असताना १ लाख ४३ हजार ८८० रुपयांच्या बेकायदेशीर दारूची वाहतूक केली.
तसेच कर्तव्यावर आसलेले पोलिस उपनिरीक्षक सलिम शेख यांना धक्काबुक्की करून शासकीय कामात आडथळा आणल्याप्रकरणी आरोपी
प्रकाश चुडाप्पा शिंदे, शरद मारुती मस्के, स्वप्निल शरद मस्के (रा. सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल – करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
फिर्याद पोहेकों सैफुल अब्दुल रसिद अन्सारी यांनी दिली आहे. ही घटना दि. १३ एप्रिल रोजी ६:४५ ते ७:३० वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी दहिवडी शिवारातील चाळीस धोंडा येथे घडली आहे. गुन्ह्यातील जीप जप्त करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा पोलिस निरीक्षक रणजीत माने,
पोसई सलीम शेख, पोहेकॉ सैफन अन्सारी, पोहेकों दिंगबर गेजगे, पोकों संतोष चव्हाण, चापोकों राजाराम तानगावडे यांनी व त्यांच्या टिमने कारवाई केली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अंकुश वाघमोडे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज