टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातून चोरीस गेलेल्या पाच मोटरसायकलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या चोरीच्या घटनेत एक अल्पवयीन मुलगा असल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी दि.३ फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजता शहरातील अशोक कोळी यांची ७० हजार रूपये किंमतीची गाडी क्र.एम.पी.२२ डी- ४९४७ मधील आरोपी महेश बंडू मोरे (खंडोबा गल्ली), आरबाज मुलाणी या दोघांना गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतले.
दुसऱ्या घटनेत दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता फटेवाडी येथील शिवाजी गणपाटील यांच्या मालकीची ५० हजार रूपये किंमतीची एम.एच.१३ डीए ९६७९ ही मोटरसायकल फिर्यादी सोलापूरला लावून गेल्यावर अज्ञात चोरटयाने पळवून नेली होती.
याबाबत गोपनीय माहिती काढून प्रमुख आरोपी सचिन केराप्पा नागणे (वय १९ रा. विठ्ठलनगर, मंगळवेढा), सिद्धार्थ विकास नागणे (वय २०, विनायक) कुमार गंधारे (वय २०) व एक अल्पवयीन बालक या घटनेत असून पोलिसांनी त्यांच्याकडून मोटरसायकली जप्त केल्या आहेत.
तिसऱ्या घटनेत दि.३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भारत सुभाष चव्हाण रा. हंगीरगे हे बाजार आणण्याकरीता शिवप्रेमी चौकात आले होते. त्यांची तीस हजार रूपये किंमतीची हिरो होंडा स्प्लेंडर ही गाडी चोरीला गेली होती.
पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून महेश बंडू मोरे (वय २१) याला अटक केली. पोलिसांनी चार मोटरसायकलीची गुन्हे उघडकीस आणून सहा आरोपींना अटक करून दोन लाख रूपये किंमतीच्या पाच मोटरसायकली जप्त केल्या.
ही कामगिरी पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधिक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी. वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड, पो. नि.रणजित माने यांनी व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज