टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या गुरुवारी निवडी झाल्या असून यामध्ये 19 ठिकाणी महिला सरपंच तर 10 ठिकाणी उपसरपंच पदावर आरूढ झाल्या आहेत.
दरम्यान,सरपंच निवड प्रक्रिया तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
मंगळवेढा तालुक्यात पहिल्या टप्प्यात 23 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती.यामध्ये गावनिहाय सरपंच,उपसरपंच पुढीलप्रमाणे
मरवडे-सरपंच सचिन घुले,उपसरपंच मिनाक्षी सुर्यवंशी,
सिध्दापूर– सरपंच लक्ष्मीबाई नांगरे,उपसरपंच भिमण्णा सिंदखेड,
बोराळे– सरपंच सुजाता पाटील,उपसरपंच संतोष गणेशकर,
हुलजंती-सरपंच मिनाक्षी कुरमुत्ते,उपसरपंच बाळासाहेब माळी,
नंदेश्वर– सरपंच सजाबाई गरंडे,उपसरपंच आनंदा पाटील,
अरळी -सरपंच मल्लिकार्जुन भांजे,उपसरपंच हेमंत तोरणे,
सलगर बु.-सरपंच शशिकला टिक्के,उपसरपंच श्रीमंत सवाईसर्जे,
माचणूर– सरपंच पल्लवी डोके,उपसरपंच उमेश डोके,
घरनिकी-सरपंच सुनिता रणदिवे,उपसरपंच बापू भुसे,
भोसे-सरपंच सुनिता ढोणे,उपसरपंच शामल काकडे,
कचरेवाडी-सरपंच संगिता काळुंगे,उपसरपंच संपदा इंगोले,
मुढवी-सरपंच महावीर ठेंगील,उपसरपंच मंदाकिनी रोकडे,
मल्लेवाडी-सरपंच दिपाली गोडसे,उपसरपंच अमित माळी,
महदाबाद शेटफळ सरपंच सरिता सुडके,उपसरपंच संतोष सोनवले,
लेंडवे चिंचाळे-सरपंच नंदाबाई इंगोले,उपसरपंच व्दारकाबाई लोखंडे,
तामदर्डी– सरपंच रेखा शिंदे,उपसरपंच बळीराम शिनगारे,
तांडोर-सरपंच कविता मळगे,उपसरपंच रोशन शेख,
लवंगी– सरपंच अलका देवकर,उपसरपंच सदाशिव लेंगरे,
डोणज -सरपंच किर्ती केदार,उपसरपंच सदाशिव कोळी,
आसबेवाडी सरपंच स्वाती आसबे,उपसरपंच शोभा खताळ,
कात्राळ– कर्जाळ-सरपंच वैष्णवी माने,उपसरपंच सुनंदा बंडगर,
लमाणतांडा-सरपंच अंजना राठोड,उपसरपंच अश्विनी राठोड,
गणेशवाडी सरपंच पद रिक्त,उपसरपंच दिपाली तानगावडे.
सलगर,तामदर्डी,आसबेवाडी,लेंडवे चिंचाळे, म.शेटफळ, माचणूर, तांडोर, बोराळे, घरनिकी,मरवडे या दहा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने येथील सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.
23 ग्रामपंचायतीपैकी 19 ग्रामपंचायतीवर महिलाराज आले आहे.प्रथमच एवढया मोठया संख्येने महिला सरपंचपदी विराजमान झाल्याने चूल आणि मूल एवढी मर्यादित म्हणून ओळखली जाणारी स्त्री राजकिय क्षेत्रातही अव्वल ठरल्या आहेत.
केवळ तीन ठिकाणी पुरुषांना सरपंच पदावर समाधान मानावे लागले.दहा ग्रामपंचायतीवर उपसरपंचपदीही महिलाच आरूढ झाल्या आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज