मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क
मंगळवेढा नगरपरिषदेला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. मंगळवेढा नगरपरिषदेकडून सन 2023-24 हे वर्ष शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यानिमित्त वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्याचे नियोजन नगरपरिषदेकडून करणेत येत आहे.
त्यापैकीच “माणुसकीच घर” या मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या संकल्पनेतून गरजु गोरगरीबांना वाटप करणेसाठी शहरातील दानशूर व्यक्तीं, व्यापारी यांनी संसारोपयोगी वस्तूंची मदत करावी असे आवाहन करण्यांत आले होते.
सदर आवाहानला अतिशय चांगला प्रतिसाद देवून शहरांतील दानशूर व्यक्ती, व्यापारी यांनी नवीन लहान मुलांची कपडे,साडया, भांडी, फुटवेअर साहित्य अशा अनेक गृहोपयोगी वस्तू देवून मोलाची मदत केली होती.
या संकलन झालेल्या गृहोपयोगी वस्तू गोरगरीब गरजवंताना प्रत्यक्ष जागेवर जाऊन नोंदी घेवून वाटप करण्यांत आल्या आहेत. शनिवार पेठ झोपडपट्टी भाग व ग्रामीण रुग्णालया पाठीमागील मरीआईवाले लोकांची झोपडपट्टी या ठिकाणी सुमारे तीनशे कुटूंबातील व्यक्तींना गृहोपयोगी साहित्याचे वाटप करणेत आले.
संकलन केलेले साहित्य अतिशय चांगल्या प्रकारे नियोजनबध्द कार्यक्रमाद्वारे योग्य त्या गरजवंताना पोहच केल्या बद्दल मदत केलेल्या दानशूर व्यक्तींनी समाधान व्यक्त केले आहे.
मंगळवेढा नगरपरिषदेच्यावतीने केलेल्या मदतीच्या आवाहानाला प्रतिसाद देवून चांगल्या प्रतीचे कपडे व गृहोपयोगी साहित्य दिल्याबद्दल शहरांतील कांही दानशूर व्यक्ती, व्यापारी यांचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव व नगरपरिषद कर्मचा-यांनी प्रत्यक्ष घरी व व्यवसायाच्या ठिकाणी जावून प्रमाणपत्र देवून आभार व्यक्त केले.
या माणूसकीच घर संकल्पनेसाठी नगराध्यक्षा अरुणा माळी, एस.एम खटावकर किराणाचे मालक आनंद खटावकर, जयभवानी नवरात्र महोत्सव, अविनाश शिंदे, सुदर्शन यादव, अनामिका क्लॉथ सेंटर, शिवपार्वती क्लॉथ सेंटर, योगीराज फुटवेअर, सुभाष फुटवेअर, छाया फुटवेअर, कैलास मर्दा, काका पवार, भागवत खवतोडे,
शांतिनिकेतन क्लाथ सेंटर, दत्तात्रय शिंदे गुरुजी, सचिन सुरवसे, सौ.निलिमा जोशी, सौ.आरती देशपांडे, या दानशूर व्यक्ती/ व्यापारी यांनी मोलाची मदत केली आहे.
मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी प्रत्यक्ष भेटून आभार मानून प्रमाणपत्र देवून दिलेल्या मदतीचे कौतूक केल्याबद्दल दानशूर व्यक्तींनी समाधान व्यक्त केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज