टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आज आहे. अर्ज माघारीची अंतिम मुदत असल्यामुळे संपूर्ण मंगळवेढा शहराचे लक्ष नगरपालिकेत कोण येणार, कोण अर्ज कायम ठेवणार आणि कोण शेवटच्या क्षणी माघार घेणार यावर खिळले आहे.

अर्ज काढण्याच्या आजच्या अंतिम दिवसामुळे संपूर्ण मंगळवेढ्यात राजकीय वातावरण गरम झाले असून,

आज दुपारपर्यंत मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत कोणी कसा डाव टाकला हे शहरासमोर येणार आहे.

अपक्ष उमेदवार हेच या निवडणुकीतील महत्त्वाचे ‘गेम चेंजर’ मानले जात असल्याने त्यांच्या निर्णयाकडे सर्व गट डोळे लावून बसले आहेत. काही प्रभागात अपक्षांनी मजबूत तयारी केल्याने पक्षांना सामंजस्य साधण्याशिवाय पर्याय नाही.

दुपारी ३ नंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होणार असून, कोण कोण अर्ज कायम ठेवणार आणि कोण अंतिम क्षणी माघार घेणार? याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.


उमेदवारांची वाढती गर्दी, पक्षनेत्यांच्या सततच्या गाठीभेटी आणि समर्थकांमधील चर्चांनी मंगळवेढ्याचे राजकीय वातावरण तापले आहे.



दुपारी ३ वाजल्यानंतरची अधिकृत यादी जाहीर होताच प्रभागनिहाय लढतीचे स्वरूप, कोणाचा प्रभाव वाढणार, कोणता गट मजबूत होणार आणि कोणत्या प्रभागात थेट सामना होणार याचे खरे समीकरण समोर येणार आहे.

तर मंगळवेढा नगरपरिषदेसाठी अर्ज माघारी घेण्याच्या दुसऱ्या दिवशी काल गुरुवारी दोन अर्ज माघारी घेण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी दिली.

शहरात भाजपकडून सर्वाधिक अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून पूरक अर्ज दाखल करण्यात आले नाहीत. त्यामुळे भाजपकडून इच्छुक असलेले उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गुरुवारी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले प्रभाग क्रमांक-१ मधील नंदकुमार विठ्ठल साळुंखे यांनी आपला अर्ज मागे घेतला. तर प्रभाग क्रमांक ५ मधील निलेश चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

अनेकांनी आपल्या उमेदवारीबाबत प्रभागात प्रचार केला होता. त्याशिवाय अनेक ठिकाणी त्यांनी लोकांना विश्वास दिला होता. मात्र महायुती म्हणून काही ठिकाणी उमेदवार बदलले आहेत. त्यामुळे आता हे उमेदवार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंगळवारी रात्री उशिरापर्यंत हरकती आलेल्या अर्जावरील सुनावणी घेण्यात आल्या. यातून हरकतीवरील निकालात ज्या हरकती आहेत, त्या फेटाळून लावत सर्व हरकती असलेले अर्ज वैध ठरवण्यात आले.

यावेळी रात्री नगरपरिषदेजवळ दोन्ही गटाच्या समर्थकांनी मोठी गर्द केली होती. बुधवारी सकाळी अज माघारी घेण्याच्या प्रक्रिया सुरूरू झाल्यानंतर प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक दहा या प्रभागातील नगरसेवक पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांनी आपली उमेदवार माघारी घेतली नाही.
आज अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आलेली आहे. या कालावधीमध्ये किती अर्ज माघारी घेतले जातील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

निवडणूक रिंगणातील नगराध्यक्षपदाचे उमेदवार
नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया जगताप (भाजप), सुनंदा आवताडे, प्रणाली आवताडे (तीर्थक्षेत्र विकास आघाडी), शुभांगी कोंडूभैरी (राष्ट्रवादी श.प.), तर अपक्ष म्हणून तेजस्विनी कदम, माधवी किल्लेदार, क्रांती दत्तू, अरुणा माळी, सुवर्णा चेळेकर, राजामती कोंडुभैरी, माधुरी कट्टे, संगीता कट्टे, राजश्री चेळेकर हे रिंगणात आहेत.

नेत्यांची तडजोडीसाठी धावपळ सुरू
अर्ज छाननी पूर्ण होताच बंडखोरांचे महत्त्व अचानक फुगले. पक्षाने तिकीट नाकारलं तरी ‘आम्हीही मैदानात !’ असा जिगरदार पवित्रा घेऊन उभे राहिलेले हे उमेदवार पात्र ठरल्यानंतर पक्षनेत्यांची झोप उडाली आहे.

बंडखोरांच्या नावावर आता गल्लीबोळात नवीनच कुजबुज ‘यांची किंमत वाढली रे बाबा’ तडजोडीचे फोन, गुप्त बैठकांचे फेरफटके, आणि ‘बंडोबा’ मंडळींची समजूत घालण्याची धडपड या सगळ्याने वातावरण चटकन बदललं.

पक्षांतर्गत समीकरणं ढवळून निघाली असून बंडखोरांभोवती अचानक गर्दी वाढलीय. कोण मागे हटणार, कोण आपली बोली वाढवणार याचीच कुजबुज सध्या राजकारणात ताप आणतेय
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













